ठाणे : आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस ताणतणावात वावरत असून, वाढत्या तणावामुळे हायपर टेंशन सारखा त्रास अनेकांना जडतो आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी रोज चालणे, योगा, आहारात बदल करणे आवश्यक आहे. ताणतणावापासून दूर रहाण्यासाठी जागतिक हायपर टेशंन दिनानिमित्त रविवारी कासारवडवली येथील टायटन मेडीसिटी हॉस्पिटलने जनजागृतीसाठी वॉकथोन चे आयोजन केलं होत.
हायपर टेंशनचा थेट संबंध हृदयाशी असून, आज बहुतांशी लोक हृदयाशी निगडित आजारांनी त्रासाले आहेत. ताण तणाव कमी करण्यासाठी आपल्या दीनचर्येत बदल करणे आवश्यक असून, हाच धागा पकडून जागतिक हायपर टेशंन दिनानिमित्त कासारवडवली येथील टायटन मेडीसीटी हॉस्पिटलने जनजागृतीसाठी वॉकथोन चे आयोजन केलं होत. यावेळी मोठ्या संख्येने ठाणेकर सहभागी झाले असल्याची माहिती रुग्णालयाचे हृदयरोगतज्ञ डॉ. विमलेश पांडे यांनी दिली.
या वॉकथोनला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. यामध्ये हायपर टेंशन पासून आपण दूर कसे राहू शकतो या बाबत माहिती देण्यात आली. दररोज किमान अर्धातास चालणे, तेलकट, मसालेदार जेवण कमी करावे, योगासन महत्वाच्या टिप्स यावेळी देण्यात आल्या होत्या…. डाॅ सुसर व डाॅ सौरभ भावे ऑनकोलाॅजिसट या वॉकथोन मध्ये उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *