मुंबई : देशात सत्तेत येण्यासाठी २७२ जागांचीच गरज असताना भाजप ४०० पारचा नारा देत आहे, कारण त्यांना संविधान बदलायचं आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. हा मुद्दा समोर येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग सत्ताधाऱ्यांवर नाराज झाल्याची चर्चा असतानाच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या मेळाव्यात बोलताना राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनीही ‘अब की बार, चारसो पार’ या घोषणेचा निवडणुकीत आपल्याला फटका बसल्याची कबुली दिली आहे.

“विधानसभा निवडणुकीवेळी लोकसभेसारखी खटपट होता कामा नयेत, आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे. आपल्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागा मिळाल्या पाहिजेत,” अशी मागणी यावेळी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *