मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार दिनांक ८ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजता `पाऊसवेळा’ हा कार्यक्रम डॉ. सुधा जोशी यांच्या सहकार्याने केंद्राच्या गोखले सभागृहात आयोजित करण्यात आला असून रसिकांसाठी खुला आहे.

पावसाआधीचा पाऊस ते परतीचा पाऊस, शैशवातला पाऊस ते प्रौढपणीचा पाऊस, पहाटेपासून मध्यरात्रीपर्य॔तचा पाऊस, आतला नि बाहेरचा पाऊस…..अनुभवा ही यामागची संकल्पना आहे. मराठीतील नव्या जुन्या साहित्यिकांच्या शब्दातून झरणाऱ्या पावसाची अनंत रूपे यावेळी रसिकांना अनुभवता येतील. या कार्यक्रमाची संहिता आणि निवेदन डॅा. वंदना बोकील-कुलकर्णी यांचे आहे तर अभिवाचन गिरीश दातार आणि श्रीमती गौरी देशपांडे करतील. त्यांना धनश्री गणात्रा संगीतसाथ देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *