नवी मुंबई : शिरवने , नेरूळ विभागात राजमहाल बार, मिनिमहल बार, डायमंड बार, क्रेझी बार, लैला बार, स्टार गोल्ड आणि साई पूजा बार असे एकूण 07 पब/बार अनधिकृत बाधकामाविरूद्ध कारवाई करण्यात आली. . सदरची कारवाई स्थानिक पोलीस स्थानक व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार डॉ राहुल गेठे उप आयुक्त (अतिक्रमण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर मोहिमेसाठी डॉ अमोल पालवे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व नेरूळ विभागातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी ,अतिक्रमण मुख्यालय पोलीस पथकथातील अधिकारी/कर्मचारी यांचासह करण्यात आली. यापुढे अशीच तीव्र कारवाई करण्यात येणार आहे.
