उल्हासनगर : गेल्या 10 महिन्यांपासून रिक्त असलेले उल्हासनगर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्तांचे पद अखेर भरण्यात आले असून महाराष्ट्र शासनाने या पदावर किशोर गवस यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे.
महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे असून एका पदावर जमीर लेंगरेकर कार्यरत आहेत. तर दुसरे अतिरिक्त आयुक्त डॉ.करुणा जुईकर यांची 5 सप्टेंबर 2023 रोजी बदली झालेली आहे. तेंव्हापासून हे पद होते.मुळात किशोर गवस हे मार्च महिन्यात उपायुक्त या पदावर महानगरपालिकेत आलेले आहेत.ते परिवहन सेवेला आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रलंबित किंबहूना प्रगतीपथावर असणाऱ्या विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करत आहेत.आता त्यांची महाराष्ट्र शासनाने पदोन्नती करून त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी सोपवली आहे.त्यामुळे किशोर गवस हे आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नागरी समस्या मार्गी लागणार असे चित्र दिसू लागले आहे.
