पनवेल : दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते श्याम पदाजी म्हात्रे यांचे सहावे पुण्यस्मरण ९ जून रोजी खांदा कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कन्या कामगार नेत्या कु. श्रुती शाम म्हात्रे यांनी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

स्व. शाम म्हात्रे यांच्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकीतून त्यांची कन्या श्रुती म्हात्रे यांनी प्रति वर्षी विविध उपक्रम राबविले आहेत. रविवारी 9 जून रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी खांदा कॉलोनी सेक्टर 8 मधील गार्डन व्हू सोसायटीमधील त्यांच्या निवासस्थानी सकाळी 10 वाजता आयोजित कारण्यात आला असल्याची माहिती कामगार नेत्या श्रुती शाम म्हात्रे यांनी दिली.

विविध पक्षातील नेते कार्यकर्ते समस्त कामगार वर्ग तसेच रोज बाजारातील विविध ठिकाणातील रोज बाजारातील व्यापारी वर्ग आणि आगरी शिक्षण संस्थेतील समस्त परिवार हे या ठिकाणी आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *