आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार

नवी मुंबई : आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

७ जून च्या रात्री तुर्भे विभागात सेव्हन स्काय बार अँड लोंज, पाम बीच गॅलरीया मॉल सेक्टर १९ डी, टीप्सीब्रो बारअँड लोंज पाम बीच गॅलरीया मॉल सेक्टर १९ डी, करिश्मा बार सेक्टर १९ सी. असे एकूण ०३ बार यांनी केलेल्या अनधिकृत बाधकामाविरूद्ध कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई स्थानिक पोलीस स्थानक व नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार डॉ राहुल गेठे उप आयुक्त (अतिक्रमण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर मोहिमेसाठी भरत धांडे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तुर्भे,डॉ अमोल पालवे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी,नेरूळ आणि तुर्भे विभागातील अतिक्रमण विभागाचे कर्मचारी,अतिक्रमण मुख्यालय पोलीस पथकथातील अधिकारी/कर्मचारी यांचासह करण्यात आली. सदर कारवाई पोटी २,५०,०००/- इतके दंडात्मक शुल्क वसूल करण्यात आले असून यापुढे अशीच कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *