माध्यमिक शिक्षणाधिकारी ललीता दहितुले यांचे आव्हान
ठाणे : ठाणे जिल्ह्यात एकूण २४ माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरू होत्या त्यापैकी २३ शाळा बंद केल्या असून सद्यस्थितीत ०१ अनधिकृत शाळा सुरू आहे. या ०१ अनधिकृत शाळेवर एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रकाशित करण्यामागे हाच उद्देश आहे कि पालकांनी पाल्याचे माध्यमिक शाळेत प्रवेश घेताना अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. पालकांनी अधिक माहिती घेऊनच पाल्याचे शाळेत प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक ललीता दहितुले यांनी केले आहे.
जिल्ह्यात अनधिकृत सुरू असलेल्या माध्यमिक शाळा बंद केल्याबाबतचे हमीपत्र सादर केलेल्या शाळाची यादी
- स्टारइंग्लिश हायस्कुल, दिवा, ठाणे मनपा क्षेत्र,
- डिवाईनग्रेस हायस्कुल, वज्रेश्वरी ता. भिवंडी जि. ठाणे,
- आरएन इंग्लिश स्कूल कोन गाव भिवंडी ठाणे,
- फरानइंग्लिश मिडीअम स्कुल,गौरीपाडा, भिवंडी जि.ठाणे,
- आरंभइंग्लिश स्कुल श्री, गणेश नगर चौळ गणेश मंदिराचे मागे दिवा आगासन रोड दिवापुर्व,
- न्युगुरुकुल कॉन्व्हेंट स्कुल श्लोकनगर दातिवली रोड दिवा पुर्व 400602,
- ग्रीनव्व्हॅली कॉन्व्हेंट स्कुल,शिवसर्थ अपार्ट सदगुर नगर, दिवा आगासन दिवा जि.ठाणे,
- एस. एस. इंग्लिशस्कुल बाबुराव रेसिडेंन्सी हनुमान मंदिर निअर दिवा,
- आरएल पी हायस्कुल शिवम अपार्ट मुंब्रादेवी कॉलनी दिवा,
- आदर्शगुरुकुल स्कुल निअर जिव्हाळा हॉल दिवा इंग्रजी,
- आदर्शगुरुकुल स्कुल वैभव ढाब्यासमोर दिवा शिळ रोड दिवा पुर्व माध्यम मराठी,
- आदर्शगुरुकुल स्कुल वैभव ढाब्यासमोर दिवा शिळ रोड दिवा पुर्व माध्यम इंग्रजी,
- एसआर पी इंग्लिश स्कुल वक्रतुंडनगर दिवा,
- ओमसाईइंग्लिश स्कुल, दातिवली रोड दिवा जि.ठाणे,
- श्री. विद्याज्योतीइंग्लिश स्कुल,नारायण कॉम्पलेस्क मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे,
- सिम्बॉयसिसस्कूल, सुंदरबन नगर, दातिवली रोड दिवा,
- केम्ब्रीजइंग्लिश स्कूल, मानसी कॉम्प्लेक्स भोलेनाथ मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे,
- पब्लीकइंग्लिश स्कुल, गणेशपाडा दातिवली दिवा,
- आर्यगुरुकुल इंग्लिश स्कुल दातिवली रोड दिवा,
- श्रीरामकृष्णा इंग्लिाश स्कुल, दिवा दातिवली रोड दिवा,
- स्मार्टएज्युकेशन इंग्लिश स्कु मुंब्रा,
- जेडी इंग्लिश स्कुल फेस 2 श्लोक नगर मुंब्रा जि.ठाणे,
- भारतइंग्लिश स्कुल गुरु कृपा अपार्ट सिध्दीविनायक नगर दिवा
जिल्ह्यात अनधिकृत सुरू असलेली माध्यमिक शाळा
१. अल मुनीहाज सेकंडरी हायस्कुल, बेलापूर, नवी मुंबई
