मुंबई : “सर्वांनी खांद्याला खांदा लावून हा पक्ष पुढे आणला. काही नेते आपल्यात नाहीत. शरद पवार यांचंही पक्ष स्थापनेतमोठ काम आहे. मी त्यांना ही कृतज्ञता व्यक्त करतो. पक्षस्थापनेवेळी सोनिया गांधी यांचा परदेशी मुद्दा काढला, मात्रत्यावेळी आपल्याला कमी वेळ निवडणुकीत मिळाला. सर्वांनीप्रयत्न केला त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. 33 टक्केजागा महिलांना होत्या, त्या आपण 50 टक्के करण्याचानिर्णय घेतला. डांन्सबार बंदी आणि गुटखा बंदीचा निर्णयआपण घेतला होता”, असे उपमुख्यमंत्री अजित पवारम्हणाले. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा25 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी अजितपवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, संबंध नसताना गैरसमज पसरवण्याचकाम काहीजण करत होते. दोन दिवस दिल्लीत होतो. आम्हीएकत्र जेवण केलं. काहीही वाद नव्हता. तरीही चुकीच्याबातम्या लावल्या. देवेंद्रफडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं. तुमची लोकसभेची एकच जागा आली आहे. तुम्हाला एकमंत्रीपद द्यायचं आहे, असं म्हणाले होते. राज्यसभा देऊनस्वतंत्र कार्यभार दिला जाणार होता. आता दोन खासदारआहेत. जुलैपर्यंत आणखी एक खासदार वाढणार हे तुम्हालामी आताच सांगतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पक्षाच्या कार्यालयातठराविक लोक बसली पाहिजेत. बाकी इतर लोकांनी सातदिवसात काय दौरा केला याची माहिती घ्या. मंत्र्यांनाही याचसूचना आहेत. आपण जरी महायुतीत असलो तरी आपणफुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. महायुतीच्या नेत्यांनाही हे आपण सांगितलं आहे. जोपर्यंत चंद्रसुर्य आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानकोणीच मायचा लाल बदलू शकत नाही. नरेटीव्ह सेटकरण्याचा प्रयत्न आपले विरोधक करतील. हे अधिवेशनझाल की जातील असं ही सांगितलं की, हे 75 वे संविधान वर्षसाजरे करण्याचे एनडीएने सांगितलं आहे. यावेळी जे अपयशमिळालं याची जबाबदारी मी घेतो, असंही अजित पवार म्हणाले.