सलमान पठाण
ठाणे : नुकत्याच मुंबई आणि ठाण्यात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं बघायला मिळालं. कापूरबावडी ते बाळकूम रोडवरील कोलशेतकडे जाणाऱ्या नाक्यावर मोठया प्रमाणात पाणी साचले आहे. अवघ्या १ तास पडलेल्या पावसातच इथे पाणी साचलेले दिसले. या साचलेल्या पाण्यामुळे मोठया प्रमाणात ट्राफिक जामचा वाहनचालकाला त्रास होत आहे. गाडी चालवताना ड्रायव्हयर्सना योग्य ती खबरदारी घ्यावी लागत आहे. महत्वाचं म्हणजे याठिकाणी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. आणि ही कामे अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर हे काम पूर्ण करून रास्ता दोन्ही बाजूने मोकळा करावा, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
