अशोक गायकवाड*

नवीमुंबई : मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी डॉ.महेंद्र कल्याणकर, भाप्रसे (एमएच:२००७) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. कल्याणकर यांचा दूरध्वनी क्रमांक ९३२४५६५११० असून त्यांचा ईमेल आयडी mahendrakalyankar@gmail.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय,पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -३२ या कार्यालयात सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत डॉ. कल्याणकर यांच्यांशी संपर्क साधता येईल.*

 

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिध्दी पत्रकानुसार दिनांक. २६ जून २०२४ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान होणार आहे. या निवडणूकीच्या अनुषंगाने मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी श्रीमती. अंशु सिन्हा,भाप्रसे (एमएच:९९) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती. सिन्हा यांचा दूरध्वनी क्रमांक ९९२०७९३६७६ असून त्यांचा ईमेल आयडी anshus72@yahoo.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय, पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -३२ या कार्यालयात सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत श्रीमती. सिन्हा यांच्यांशी संपर्क साधता येईल. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एन नवीन सोना, भाप्रसे (एमएच:२०००) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोना यांचा दूरध्वनी क्रमांक ८५९१२४८६६८ असून त्यांचा ईमेल आयडी nawin.sona@gmail.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय,पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -३२ या कार्यालयात सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत सोना यांच्यांशी संपर्क साधता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *