ठाणे : रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया करायच्या झाल्या तर सर्वांनाच खर्च परवडणारा नसतो. मात्र अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हील रुग्णालय आधारवड ठरत आहे. गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या ३५००  शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शस्त्रक्रिया  सिझर (LSCS) असून, त्या खालोखाल डोळे, दंत अस्थीरोग, कान, नाक, इत्यादी शस्त्रक्रियांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात वागळे इस्टेट येथे तात्पुरत्या स्वरूपावर सिव्हील रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले. मात्र असे असताना, रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे. रुग्णालयात दर दिवशी सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. काहीवेळा या रूग्णांवर लहान मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. एका महिन्याला सरासरी ३०० ते ३५० शास्त्रिक्रिया पार पडत आहेत. जून २०२३- २४  या वर्षभरात ३५०० रूग्णांवर शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षात आधुनिक उपकरणे असून,  मोठ्या कुशलतेने वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करत आहेत. झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये सर्वाधिक सिझरच्या (LSCS) २००० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत जनरल सर्जरी ४००, स्त्रियांचे विविध अजार २०३ सोबतच डोळ्यांच्या ४५२, दंत २२९, अस्थी २३८,  या बरोबर पोट, कान, नाक, आदींच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.

खाजगी रुग्णालयात न परवडणाऱ्या जोखमीच्या शस्रक्रिया आणि औषधोपचार सिव्हिल रुग्णालयामध्ये मोफत होत असून एक महिन्यांपूर्वी  अमीबियामुळे  यकृतावर आठ फोड आलेल्या गुजरात मधील एका रुग्णांवर सिव्हील रुग्णालयात  यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. सहा महिन्यापूर्वी  गरीब  कुटुंबातील एका दोन वर्षीच्या मुलीला जन्मजात मोतीबिंदू असल्याने अशी शस्त्रक्रिया करणे डॉक्टरांसाठी आव्हान होते. परंतु आव्हान पेलवत रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रथमच दोन्ही डोळ्यांची अवघड मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून मुलीला दृष्टी दिली आहे. आठ महिन्यांपूर्वी एका महिलेच्या मणक्याची जोखमी  शस्त्रक्रिया करण्यात आली होती

कोट

शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक  उपकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे खाजगी रुग्णालयात महागड्या शस्त्रक्रिया सिव्हील रुग्णालयात होतात. काही वेळा महात्मा ज्योतिबा फुले ह्या जन आरोग्य योजने अंतर्गत देखील रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असतात.  दुर्बिणीद्वारे देखील जोखमीच्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत.

डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *