डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर, गरीबाचापाडा, नवापाडा, देवीचापाडा, महाराष्ट्रनगर भागाचा वीज पुरवठा मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून तांत्रिक बिघाडामुळे बंद होता. हा बंद वीज पुरवठा सुरू करण्याचे महावितरण अभियंत्यांचे रात्रीपासून प्रयत्न सुरू होते. अखेर दहा तासाच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी सकाळी साडेदहा वाजता वीज पुरवठा पूर्ववत झाला.

डोंबिवली पश्चिमेतील महावितरणच्या बहुतांशी वीज वाहिन्या जुनाट झाल्या आहेत. बहुतांशी शहरांमधील खांबांवरील वीज पुरवठा देण्याची पद्धत महावितरणने बंद केली आहे. डोंबिवलीत अद्याप खाबांवरील वीज पुरवठा बंद करून या वीज वाहिन्या जमिनीखालून नेण्यात येत नसल्याने जिवंत वीज वाहिन्यांना कार्बड पकडणे, वीज प्रवाह सुरू असताना त्या वाहिनीला एखादा पक्षी चिकटणे, झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांना लागून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचा फटका इतर आठ महिन्यांपेक्षा पाऊस सुरू झाला की अधिक प्रमाणात बसतो. पाऊस सुरू झाल्यापासून डोंबिवली, कल्याण शहराच्या अनेक भागांमध्ये विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. अगोदरच उकाड्याने नागरिक हैराण आहेत. त्यात वीज पुरवठा गेला की नागरिकांचा संताप अनावर होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *