नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका बी विभाग नेरूळ कार्यक्षेत्रांर्तगत महात्मा गांधीनगर (एम.आय.डी.सी.) डी – ब्लॉक मधील पाण्याच्या पाईपलाईन लगत असलेल्या सर्व अनधिकृत हॉटेलवर नेरूळ विभाग कार्यालयामार्फत अतिक्रमण विरोधी पथकाने निष्कासन कारवाई केलेली आहे. त्यामध्ये श्रीकृष्ण भोजनालय व दयाशंकर गौंड यांच्या कॅन्टीनचा समावेश आहे.
अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली या अनधिकृत हॉटेल्सवरील निष्कासन कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली आहे. या मोहीमेकरीता 10 मजूर, 1 जेसीबी, 1 डंपर व 2 पिकअप व्हॅन वापरण्यात आल्या. सदरची कारवाईत नेरूळ अतिक्रमण विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचे समवेत सुरक्षारक्षक, स्थानिक पोलीस यांचा सहभाग होता.
