अशोक गायकवाड

नवी मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना (मुले-मुली) परदेशांमध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी दि. १२ जुलै २०२४ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन वंदना कोचुरे प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण मुंबई विभाग यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागाची परदेशी शिष्यवृत्ती योजना अत्यंत महत्वाची योजना आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. या योजनेसाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यतील असावा व त्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा जास्त नसावे इत्यादी या योजनेच्या अटी आहेत. विद्यार्थ्यांनी अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील ‘ताज्या घडमोडी’ या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *