मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने २२ ते २४ जून २०२४ दरम्यान रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या सहकार्याने ९ वी एम सी एफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन, प्रेमनगर, बोरिवली ( पश्चिम ), मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. पुरुष एकेरी आणि महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये हि स्पर्धा खेळविण्यात येणार असून स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक असलेल्या खेळाडूंनी आपली नावे आपल्या जिल्हा कॅरम संघटनेमार्फत दिनांक १५ जून २०२४ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, राजा राणी चौक जवळ, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, माहिम, मुंबई – ४०००१६ येथे सायंकाळी ६ ते ८ दरम्यान नोंदवावीत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *