अमोल मिटकरींचा अजब तर्क

अकोला: भाजपला राज्यात मिळालेल्या लोकसभेच्या ९ जागा या केवळ अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेमूळेच मिळाल्याची अजब तर्क अमोल मिटकरींनी मांडला आहे.

कालच राजकीय भाष्य करण्याआधी प्रदेशाध्यक्षांची परवानगी घ्या असा आदेश सुनील तटकरेंनी काढाला होता. त्याल २४ तासही उलटत नाही तोच मिटकीर यांनी पुन्हा भाजपावर जोरदार टिका केली आहे.

 राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी आज परत नव्याने भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. भाजपनं आमची मतं घेतलीत. परंतू, त्यांची मतं भाजपला मिळालीच नसल्याच्या गंभीर आरोपाचा पुनरूच्चार मिटकरींनी केलाय. ते अकोल्यात बोलत होते. भाजपला राज्यात मिळालेल्या ९ जागा अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेमूळेच मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय. भाजपची मतं मिळाली असती तर आमचा बारामतीसह चार जागांवर पराभव झालाच नसता, असंही मिटकरी म्हणालेय. त्यामुळे मिटकरी़च्या या वक्तव्यामुळे महायुतीत आता पुन्हा नव्याने वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, अजित पवारांना जाणीवपुर्वक डावललं गेलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला होता. त्यावर भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी मिटकरींवर टीका करतांना त्यांचा आवाका आणि कुवत काढली होती. त्यावर अमोल मिटकरींनी आपल्यालाही दरेकरांच्या भाषेत बोलता येतं. मात्र, आपल्यावरील संस्कारामुळे आपण असो बोलणार नसल्याचा टोलाही मिटकरींनी दरेकरांना लगावलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *