कर्ज योजनांसाठी संकेतस्थळावरून अर्ज करण्याचे आवाहन
ठाणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत दारिद्र्य रेषेखालील बेरोजगारांकरिता विविध कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी www.lokshahir.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. अनुसूचित जातीतील युवकांनी या संकेतस्थळावर जाऊन विविध कर्ज योजनांसाठी अर्ज करावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती – मांग, मातंग, मिनी मादिंग, मादिग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग-गारुडी, मांग-गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील 18 ते 50 या वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील (वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 3,00,000/-) बेरोजगारांकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. महामंडळामार्फत थेट कर्ज योजना (कर्ज मर्यादा रु.1.00 लाख) तसेच केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या पीएम एजेएवाय योजनांचे कर्ज प्रस्ताव/अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी पोर्टल विकसित करण्यात आले असून www.lokshahir.in अशी आहे. या सुविधेचा ठाणे जिल्ह्यातील मांतग समाजातील शहरी / ग्रामीण भागातील इच्छुक / पात्र व्यक्तीने जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
कर्जप्रस्ताव सादर केल्यानंतर महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार मंजुरी संदर्भातील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहितीकरिता जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ३ रा मजला, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, सहयाद्री शाळेच्या बाजुला, खारेगाव, कळवा (प), ठाणे ४००६०५. दूरध्वनी क्र. ०२२-२५३८८४१३. या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) च्या जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी कळविले आहे.
000000
