पदवीधर निवडणुकीत पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन
ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपासह महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठीशी कोकणातील विविध स्तरांतील संघटना उभ्या राहिल्या आहेत. प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कोचिंग क्लासेस, विद्यार्थी संघटनेबरोबरच भंडारी, कुणबी, धनगर समाजासह ज्ञाती संस्था, दिव्यांग आणि इंजिनियर संघटनांनी आमदार डावखरेंना पाठिंबा जाहीर केला. तसेच त्यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.
माजी शिक्षक आमदार स्व. रामनाथ मोते यांची महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटना, आमदार किसन कथोरे यांचा महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघ, आमदार मनीषा कायंदे यांची महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट), आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना, ज्येष्ठ नेते डॉ. आर. बी. सिंह यांची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी अँड कॉलेज एम्प्लॉईज फेडरेशन यांनी आमदार डावखरे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ, सूर्यवंशी क्षत्रिय (कुणबी) ज्ञातिहितवर्धक मंडळ, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, खान्देश सेना या ज्ञातीसंस्थांनीही प्रचारात सक्रिय भाग घेण्याची ग्वाही दिली. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने आपला उमेदवार माघारी घेऊन महायुतीला साथ दिली. त्याचबरोबर
रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा), राज्यातील २६ संस्थांचे फेडरेशन असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाबरोबर संलग्न अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघ, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा), राज्यातील २६ संस्थांचे फेडरेशन असलेली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाबरोबर संलग्न अखिल रायगड प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पालघर शाखा, अखिल ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, पालघर जिल्हा महिला प्राथमिक संघ, पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाबरोबर संलग्न तलासरी तालुका प्राथमिक शिक्षक संघ, पदवीधर माजी विद्यार्थी शिक्षक पालक संस्था, कोकण पदवीधर फोरम, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन यांच्याबरोबर संलग्न पालघर-ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, सिंधूरत्न दिव्यांग प्रेरक संस्था, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ, शिवशंभु प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग (जि. प./ न. पा. /मनपा) संघटना, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशन, कल्याण येथील नूतन शिक्षण संस्था, अखिल कोकण विकास महासंघ, ठाणे येथील जीवन ज्योती इंग्लिश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाने आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला. तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले आहे.
-00000
00000
