एम.एम.आर.डी.ए.च्या ४० एकर जागेवरील

अनिल ठाणेकर

 

ठाणे : बोरीवडे येथील मैदानावर पी.पी.पी. तत्वावर उभारण्यात येणार्या कन्व्हेंशन सेंटर व स्पोर्टस् क्लब मोघरपाडा येथील एम.एम.आर.डी.ए.च्या ४० एकर जागेवर स्थलांतरीत करण्यात यावे. येथील विविध खेळ खेळण्याकरिता या मैदानाचा उपयोग क्रीडापट्टूना करता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली असून त्याची लवकरच पुर्तता होणार आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून या परिसरामध्ये अनेक नविन क्रिडापट्टू राहावयास आलेले आहेत. तसेच कित्येक लहान मुले ही वेगवेगळ्या क्रीडाक्षेत्रात पारंगत होण्यासाठी कासारवडवली येथील बोरीवडे मैदानाचा सरावासाठी वापर करीत असतात. मला मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ऍथलेटिक स्पर्धकांनी ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या अधिकार्यांची भेट घेऊन ’या मैदानावर ऍथलेटिक ट्रॅक , बास्केटबॉल, हॉलीबॉल तसेच शिवाजी पार्कच्या धर्तीवर क्रिकेट स्पर्धांसाठी वापर करावा“, अशी मागाणी केली असून क्रीडा विभागाने त्याबाबतचा प्रस्तावही तयार केल्याचे समजते. घोडबंदर परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी २० एकरामध्ये असलेल हे एकमेव मैदान असून या मैदानाचा वापर क्रीडापट्टूना होणे गरजेचे आहे. बोरीवडे मैदानातील २० एकर जागेच्या सभोवताली कुंपन भिंत, सुसज्य प्रवेशद्वार त्याचबरोबर क्रीडापट्टूना एम.सी.ए.च्या धर्तीवर इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र, बॅटमिंटन, हॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, स्कॉश कोर्ट, मॅटवर खेळला जाणारा कुस्तीचा आखाडा, मुष्टियोध्दांसाठी आखाडा, मल्लखांब, मॅटवरची कबड्डी, खो-खो, लाँग टेनिस कोर्ट, यासह मैदानाच्या सभोवताली ऍथलेटिक्स खेळाडूंसाठी तीन मीटरचा सिथेंटिक ट्रॅक अश्या प्रकारचे विविध खेळ खेळण्याकरिता या मैदानाचा उपयोग क्रीडापट्टूना करता यावा यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ५० कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली असून त्याची लवकरच पुर्तता होणार आहे. त्यामुळे सर्व खेळांना प्राधान्य देणारे घोडबंदर परिसरातील हे एक अद्ययावत क्रीडा संकुल होईल यात शंका नाही.त्याचबरोबर भविष्यातील विकासाच्या दृष्टीने व विविध मोठमोठ्या व्यावसायिकांकरिता तसेच क्रीडापट्टूकरिता गोरेगाव येथील नेस्को, वरळीतील डोम यासारख्या कन्व्हेंशन सेंटर तसेच बीकेसी येथील स्पोर्टस् क्लब प्रमाणे ठाणे शहरामध्ये सुध्दा या सुविधा देणे गरजेचे आहे. त्याकरिता मोघरपाडा येथील एम.एम.आर.डी.ए.च्या ४० एकर जागेवर बीकेसी येथे असलेल्या एम.सी.ए.च्या धर्तीवर क्रिकेट क्लब व कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासंदर्भात माझी मुख्यमंत्र्यांशी व एम.एम.आर.डी.ए.च्या आयुक्तांशी चर्चा झाली आहे. त्याप्रमाणे आपण बोरीवडे येथील पी.पी.पी. तत्वावर उभारण्यात येणारा प्रकल्प मोघरपाडा येथील एम.एम.आर.डी.ए.च्या ४० एकर जागेवर स्थलांतरीत करून ऍथलेटिक तसेच विविध क्रीडा प्रकारात पारंगत असलेल्या क्रीडापट्टूना दिलासा द्यावा, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त सौरभ राव यांन केली आहे.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *