माथेरान : पावसाळा म्हणजे तरुणाईला साद घालणारा निसर्ग, अनेक जण पावसाळा सुरू होण्याची वाट पाहत असाल व पावसाला सुरुवात होताच वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा आनंद घेण्याकरता कोणतीही माहिती न घेता थेट पोहोचत असतात परंतु या हौशी पर्यटकांना माहिती अभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते पहिल्याच पावसामध्ये अशा अनेक अपघाती घटना घडल्याने हा प्रश्न आता खंबीर स्वरूप धारण करीत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा भेद करत असाल तर त्या ठिकाणचे सर्व माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे व त्याकरिता माथेरान मध्ये माथेरान पोलिसांनी एक मोहीम सुरू केली असून केव्हाही कुठे माथेरान परिसरात गरज असल्यास पोलीस खाते तत्पर असणार असल्याचे येथील एपीआय अनिल सोनोने यांनी सांगितले.
माथेरान हे मुंबई पुणे ठाणे कल्याण नाशिक यासारख्या मेट्रो सिटी पासून अगदी जवळचे पर्वतीय पर्यटन स्थळ आहे माथेरानच्या पर्वत रांगांची अनेक पर्यटकांना नेहमीच भुरळ पडलेली आहे, त्यामुळे तरुणाई पाऊस सुरू होण्या अगोदरच माथेरानला येणाऱ्या पर्वतीय पर्वतरांगांमधून ट्रेकिंग द्वारे येण्याचे बेत आखत असतात, व पावसाला सुरुवात होताच माथेरानच्या डोंगररांगा या हौशी ट्रेकर्सने फुलून गेलेल्या दिसतात परंतु या परिसराचे योग्य माहिती नसल्याने अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत असते त्यामुळे माथेरानला येण्याअगोदर येथील पर्वतीय रस्ते व त्याच्या सुरक्षिततेची योग्य माहिती असणे गरजेचे आहे.
माथेरान करिता येणारे सुरक्षित ट्रेकिंगचे रस्ते
पनवेल येथून माथेरान करिता धोधानी पर्यंत बस सेवा उपलब्ध आहे व तिथून पुढे माथेरान करिता दोन पायवाटा आहेत त्यातील मंकी पॉइंट येथून येणारी वाट ही पावसाळ्यात अती धोकादायक आहे,त्यामुळे हौशी गिर्यारोहकांनी ही वाट न पकडता येतील सनसेट पॉईंट येथे येणारी कमी धोकादायक वाटेने आल्यास अधिक सोपे जाते ,
येथील खालापूर तालुक्यातील चौक येथून ही माथेरान करिता दोन रस्ते येतात त्यातील एक थेट वन ट्री हिल पॉइंट येथे येतो तर दुसरा रामबाग पॉइंट येथे येतो .
नेरळ येथून पेब किल्ला फिरून माथेरान हा ही एक मार्ग सध्या पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरत आहे .
भिवपुरी येथून येथील गारबट पॉइंट हा ही एक अतिशय अवघड ट्रेक उपलब्ध आहे परंतु जे हौशी पर्यटक आहेत त्यांनी हा टाळलेलाच बरा, अशा अनेक वाटा पावसाळी पर्यटनासाठी हौशी गिर्यारोहक शोधत असतात पण रस्त्यांची संपूर्ण माहिती नसल्याने अनेकांना अपघातास सामोरे जावे लागते त्यात प्रामुख्याने अनेक जण निसरड्या वाटेने जाण्यासाठी लागणारे साहित्य बरोबर नेत नसल्याचे निदर्शनास येत आहे तर काही स्वतःबरोबर प्राथमिक उपचाराचे साहित्य बरोबर ठेवत नाही तर निसरड्या वाटेवरून चालण्यासाठी लागणारे ट्रेकिंग शूज ही न वापरता अशा ठिकाणी गेल्यानंतर अपघातास आमंत्रण देत असतात सर्वात महत्त्वाचे आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणची भौगोलिक माहिती काही आपत्कालीन परिस्थिती तर आवश्यक ते टेलीफोन नंबर त्या ठिकाणी मोबाईल साठी नेटवर्क आहे का की आपण दुसऱ्यांची संपर्क साधू शकतो अशी माहिती न घेताच अनेक जण या ट्रिप टाकत असतात व अपघातास आमंत्रण देतात त्यामुळेच माथेरानला येण्यापूर्वी या सर्व गोष्टीचा विचार करून ट्रिप आखावी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी माथेरान मध्ये आपत्कालीन स्थिती उद्भाविल्यास खालील नंबर बरोबर संपर्क करावा.
