नवी मुंबई : शहर प्लास्टिकमुक्त असण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने विविध माध्यमांतून प्रयत्न करत असून नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या तसेच एकल वापर प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमाही राबविण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार एकल वापर प्लास्टिक फ्री मार्केट ही संकल्पना राबविली जात आहे. या मार्केटमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी कापडी पिशव्या वेंडींग मशीन लावण्यात येत आहेत.
प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिम राबवताना तुर्भे विभाग कार्यालयांतर्गत सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. भरत धांडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे आणि परिमंडळ 1 चे उपायुक्त श्री. सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणा-या दोन व्यावसायिकांवर कारवाई करत प्रत्येकी रु. 5 हजार प्रमाणे एकूण रू. 10 हजार इतकी दंडात्मक रक्कम जमा केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वच्छता पसरवणा-या दोन व्यावसायिकांविरुध्द कारवाई करुन प्रत्येकी रु. 250/- प्रमाणे एकूण रु. 500/- इतका दंड वसूल केला. या कारवाईमध्ये स्वच्छता अधिकारी श्री.जयेश पाटील आणि स्वच्छता निरीक्षक सहभागी होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *