ठाणे : विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने रानभाज्या व औषधी वनस्पतींचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्या शनिवारी (ता. २९) आयोजन करण्यात आले आहे. नौपाडा येथील सरस्वती विद्या मंदिरात उद्या सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत ठाणेकर नागरिकांना रानभाज्यांची माहिती देण्याबरोबरच विक्री केली जाणार आहे.
ठाणे शहरातील नव्या पिढीला रानभाज्यांची माहिती आणि पौष्टिक रानभाज्यांचा आस्वाद देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले व सदस्या वृषाली वाघुले-भोसले यांनी दिली. या प्रदर्शनाला ठाणेकरांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
