मुंबई : मुंबईतील महिला विकास मंडळ सभागृहात आज शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी अभियानाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्यातील जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांना सदस्य नोंदणी अभियानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सध्या दिल्ली येथे संसदीय अधिवेशन सुरू असल्याने या कार्यक्रमाला व्यक्तिशः उपस्थित राहता आले नसल्याने ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांना संबोधित केले.
राज्यातील जनता शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे लोकसभेच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विधानसभेत देखील जोमाने काम करायचे आहे. या अभियानाच्या माध्यमातून पक्ष संघटनेला अधिक बळ मिळणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख ते शाखाप्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांनी अधिक सदस्य नोंदणी कशी होईल यासाठी नियोजनात्मक काम करायला हवे. याचा सर्वाधिक फायदा हा आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित रित्या काम करायला हवे. असे आवाहन यावेळी सर्व शिवसैनिकांना केले.
या उपक्रमाला शिवसेनेचे नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व सचिव, राज्यभरातून आलेले जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते.