साने गुरुजी
दिन विशेष श्याम ठाणेदार आज भारत मातेचे थोर सुपुत्र, स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक साने गुरुजी यांची पुण्यतिथी. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा…
दिन विशेष श्याम ठाणेदार आज भारत मातेचे थोर सुपुत्र, स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक साने गुरुजी यांची पुण्यतिथी. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. त्यांचा…
वेध जनार्दन पाटील यंदाचा पाऊसकाळ सुरू झाला असून सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. मात्र सध्या पाऊसही लहरीपणा दाखवत असल्याचे गेल्या काही वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे. म्हणूनच…
अखेर नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. हा मान यापूर्वी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मिळाला होता. सलग…
अनिल ठाणेकर ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या राज्य शासनाच्या निधीतील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित कामांचा, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक हे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मदतीने धडाका लावणार…
अशोक गायकवाड मुंबई : ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गा’वरील मरीन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली परिसरापर्यंत उत्तर वाहिनी आजपासून खुली करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र…
मुंबई : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे ठाणे जिल्ह्यात ऑरेंज तर मुंबईला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावलीआहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशीही पावसाचाजोर पाहायला मिळत आहे. आजपासून पुढील पाच दिवसमुंबई, ठाणेसह राज्यात पावसाचा जोर असाच कायमराहणार असल्याचं आयएमडीने सांगितलं आहे. येत्या पाच दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईत मान्सून दाखल झाला असून मुंबईकरांना पावसानंचांगलंच झोडपलं आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्येयेत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजहवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच येत्या आठवड्याभरातमान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे.हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांतसाधारणपणे ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरातगडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुठे ऑरेंज, तर कुठे यलो अलर्ट ठाणे, रायगड, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांतजोरदार पावसाची शक्यता असून आज 10 जून रोजी ऑरेंजअलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या कोकणासहदक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र तसेचमराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस तसेच मेघगर्जनेसहपाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येतुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 50-60 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार तेअति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरमध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्येतुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणिसोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यताआहे.
मुंबई : “सर्वांनी खांद्याला खांदा लावून हा पक्ष पुढे आणला. काही नेते आपल्यात नाहीत. शरद पवार यांचंही पक्ष स्थापनेतमोठ काम आहे. मी त्यांना ही कृतज्ञता व्यक्त करतो. पक्षस्थापनेवेळी सोनिया गांधी यांचा परदेशी मुद्दा काढला, मात्रत्यावेळी आपल्याला कमी वेळ निवडणुकीत मिळाला. सर्वांनीप्रयत्न केला त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. 33 टक्केजागा महिलांना होत्या, त्या आपण 50 टक्के करण्याचानिर्णय घेतला. डांन्सबार बंदी आणि गुटखा बंदीचा निर्णयआपण घेतला होता”, असे उपमुख्यमंत्री अजित पवारम्हणाले. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा25 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी अजितपवार बोलत होते. अजित पवार म्हणाले, संबंध नसताना गैरसमज पसरवण्याचकाम काहीजण करत होते. दोन दिवस दिल्लीत होतो. आम्हीएकत्र जेवण केलं. काहीही वाद नव्हता. तरीही चुकीच्याबातम्या लावल्या. देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं. तुमची लोकसभेची एकच जागा आली आहे. तुम्हाला एकमंत्रीपद द्यायचं आहे, असं म्हणाले होते. राज्यसभा देऊनस्वतंत्र कार्यभार दिला जाणार होता. आता दोन खासदारआहेत. जुलैपर्यंत आणखी एक खासदार वाढणार हे तुम्हालामी आताच सांगतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पक्षाच्या कार्यालयातठराविक लोक बसली पाहिजेत. बाकी इतर लोकांनी सातदिवसात काय दौरा केला याची माहिती घ्या. मंत्र्यांनाही याचसूचना आहेत. आपण जरी महायुतीत असलो तरी आपणफुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. महायुतीच्या नेत्यांनाही हे आपण सांगितलं आहे. जोपर्यंत चंद्रसुर्य आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानकोणीच मायचा लाल बदलू शकत नाही. नरेटीव्ह सेटकरण्याचा प्रयत्न आपले विरोधक करतील. हे अधिवेशनझाल की जातील असं ही सांगितलं की, हे 75 वे संविधान वर्षसाजरे करण्याचे एनडीएने सांगितलं आहे. यावेळी जे अपयशमिळालं याची जबाबदारी मी घेतो, असंही अजित पवार म्हणाले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकरच्या झटक्याने काल न्यूयॉर्क, अमेरिका येथे निधन झालं. रविवारी रात्री एमसीएच्या पदाधीकाऱ्यांसाह न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान…
“1 खासदार असलेल्या मांझींना कॅबिनेट, 7 खासदारअसलेल्या शिवसेनेला एकही का नाही?” – श्रीरंग बारणें मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ७ खासदार जिंकून आले असतानाही कॅबिनेट मंत्रिपद न देता केवळ एका राज्यमंत्रीपदावर बोळवण केल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य उद्भवले आहे. मावळचे खासदार श्रीरंगबारणे यांनी आज यावरून भजपावर जाहीर टीका केलीय. चिराग पासवान यांचे पाच खासदार असताना कॅबिनेटमंत्रिपद मिळाले, एक खासदार असणाऱ्या मांझी यांनाहीकॅबिनेटमंत्रिपद मिळाले, कुमारस्वामी यांना दोन खासदारअसताना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले, आम्हालाही कॅबिनेटमंत्रिपद मिळायला हवं होतं, असे मावळचे खासदार श्रीरंगबारणे यांनी सांगितले. ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळीत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7 खासदारआले असतानाही कॅबिनेट मंत्रिपद न दिल्यामुळे दुजाभावझाल्याचं सांगितलं. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार आहेत. भाजप, जेदयु, टीडीपी यांच्यानंतर एनडीएमधील शिवसेनेलासर्वाधिक खासदार आहेत. पण तरीही कॅबिनेट मंत्रिपदमिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं समोरआलेय. खासदार श्रीरंग बारणे यांनी याबाबत उघडपणे भाष्यकेलेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्रिपद देऊन, दुजाभाव करण्यात आला. आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेटपाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंम्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी उघडपणे नाराजीव्यक्त केली आहे. एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक-एकखासदार निवडून आलेत, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिलंगेलं. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असंहोतं तर मग कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्याअजित पवारांनाही एक मंत्री पद द्यायला हवं होतं. तसेचभाजपने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपदद्यायला हवं होतं. असं म्हणत बारणेंनी खदखद बोलूनदाखवली. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळायला हवं होतं – देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळस्थापित झाले आहे. या निवडणुकीचा जर विचार करताशिवसेना पक्ष जुना साथी आहे. एनडीएचा जुना साथी म्हणूनशिवसेना पक्षाला कॅबिनेट मंत्री मिळावे ही माफक आपेक्षाहोती. चंद्राबाबू नायडू यांचे सोळा खासदार निवडून आले, त्याचबरोबर नितेश कुमार यांचे 12 खासदार निवडून आले. त्या खालोखाल शिवसेना पक्षाचे सात खासदार निवडूनआले. चिराग पासवान यांचे पाच खासदार निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं. कुमारस्वामी यांचे दोन खासदारकर्नाटकातून निवडून आले, त्यांना एक कॅबिनेट मंत्रिपद दिले. त्याचबरोबर बिहार मधून जितन मांझी एकटे निवडून आले, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले. तर शिवसेना पक्षाला एककॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री मिळावे, अशी आमचीअपेक्षा होती. कॅनिबेनट मंत्रिपदाची शपथ आमच्याखासदाराने घेतली असती तर आम्हाला समाधान मिळालेअसते, असे श्रीरंग बारणे म्हणाले.
विधानसभेत शिंदें इतक्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात मुंबई : लोकसभा निवडणूकीत पराभवाचा दणका बसल्यानंतर आता भाजपाप्रणीत महायुतीत पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्रीछगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा ठिणगी टाकली आहे. “आम्ही मागच्या वेळेस म्हटलं की ८० जागा आम्हाला कमीत कमी मिळाल्या पाहिजेत. तर हे ताबोडतोब माझ्या विरोधात बोलू लागले. मी म्हटलं बर बबा नाही बोलत. जागा वाटपाचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालवून तुमचा फायदा होणार नाही. याचा लवकर निपटारा करायला पाहिजे. उमेदवार काय करायचे नंतर ठरवा. भाजप मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, मान्य आहे. पण आम्ही सुद्धा सांगितलं की, आमचे जेवढे आमदार आहेत, तेवढेच शिंदेंचे आहेत. त्यामुळेत्यांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळायलाहव्यात” असे छगन भुजबळ म्हणाले. मुंबईत अजित पवारांच्याराष्ट्रवादीचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळीछगन भुजबळ बोलत होते. आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही छगन भुजबळ म्हणाले, आता विधानसभेची निवडणूक आहे, म्हणजे संविधानाचा प्रश्न नाही. संविधान बदलाचे कामहोणार नाही. तो लोकसभेचा मुद्दा होता, आता विधानसभेलाचालणार नाही. आपले मतदार दलित, ओबीसी, मराठा हेआपले मतदार आपल्याला परत मिळवावे लागतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या गोष्टी आपल्याला कराव्याचलागतील. त्यांना विश्वास द्यावा लागेल. युपीमध्येहीसंविधानाबाबत प्रचार झाला, त्यामुळे महायुतीच्या जागाकमी आल्या. महायुतीला ठेच लागली आहे, हे नाकारुनचालणार नाही. लोकभा निवडणूकीत महायुतीला ठेच लागलीहे नाकारुन चालत नाही. दगडधोंडे बाजूला करावे लागतील. मुंबईत प्रत्येक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. विकासविकास आणि विकास मात्र मुंबईत किती निवडून आलेआहेत. लाखो कोटी खर्च केले, मात्र आपले उमेदवार निवडूनआले नाहीत, असंही भुजबळ यांनी सांगितलं. मुस्लीम समाज, दलित समाज आपल्याला सोडून बाजूला झाले पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, मुस्लीम समाज, दलितसमाज आपल्याला सोडून बाजूला झाले. 400 पार म्हणालो, त्याचा प्रचार असा झाला की, संविधान बदललं जाणार आहे. मोदींनी खुलासा केला, पण तोपर्यंत लोकांना वाटलं 400 पारम्हणजे आपला बेडा पार झाला. दलित, मुस्लीम समाजआपल्यापासून गेला तर आपलं काय? संविधान बदलणारम्हणजे आपलं आरक्षण जाणार असंही लोकांच्या डोक्यातआलं. आपलं नुकसान करण्यासाठी विरोधी पक्ष प्रचारकरणार आहे. आपण त्यामध्ये सुधारणा करु शकलो नाही, हेसत्य आहे.