Month: June 2024

खातेवाटप जाहीर

अमित शाह पुन्हा गृहमंत्री, गडकरींकडे रस्ते  विकास नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अमित शाहयांच्याकडे पुन्हा एकदागृहमंत्रीपद  सोपवण्यात आले आहे. नितीन गडकरींकडे रस्ते  विकास कायम ठेवण्यात आले आहे. राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचीजबाबदारी देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्रालय एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांनीरविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह72 मंत्र्यांनी पद आणि गोपिनीयतेची शपथ घेतली होती. त्यानंतर आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. मोदी कॅबिनेटचं खातेवाटप जाहीर! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 जणांनी रविवारी 9 जूनला  कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीहोती. महाराष्ट्रातील 6 जणांचा यामध्ये समावेश होता. शपथघेतल्यानंतर या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार याकडेसर्वांचं लक्ष होतं. अखेर आज हे खातेवाटप जाहीर करण्यातआलं. त्यानुसार नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणिपरिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एसजयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणिअश्विनी वैष्णव यांना रेल्वे मंत्रालय मिळालं आहे. बिहारने केली होती रेल्वे मंत्रालयाची मागणी बिहारमधील घटकपक्ष असलेल्या नितीश कुमार यांनी रेल्वेमंत्रालयाची मागणी केली असल्याची माहिती होती. पण हेखातं भाजपच्या अश्विनी वैष्णव यांच्याकडेच राहणारअसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय? अमित शाह- गृहमंत्रालय राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय एस जयशंकर – परराष्ट्र नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय…

खोटे नॅरेटिव खोडून काढण्यात आले अपयश….

भारतीय जनता पक्षाच्या पिछेहाटीची कारणमिमांसा (भाग ४) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीचे अक्षरशः पानदान वाजले. या संदर्भात विचार करण्यासाठी भाजप आमदारांच्या बैठकीत बोलताना आमच्या विरोधकांनी चुकीचे…

उल्हासनगर महानगरपालिकेच्या 751 कर्मचाऱ्यांना पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबरचे वितरण

उल्हासनगर : दिनांक 1 नोव्हेंबर 2005 नंतर उल्हासनगर महानगरपालिकेत कामावर रुजू झालेल्या 900 पैकी 751 कर्मचाऱ्यांना आयुक्त अजीज शेख यांनी गिफ्ट दिली असून त्यांना पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(प्राण)किटचे वितरण करण्यात आले आहे. शासनाने कर्मचाऱ्यांसाठी अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू केली होती.शासनाच्या धर्तीवर उल्हासनगर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करुन अशा कर्मचाऱ्यांसाठी शेअर बाजाराशी संबंधित शासन मान्यताप्राप्त एनएसडीएल प्रोटीन या कंपनी सोबत करार करण्यात आला.आणि कंपनीकडून पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(प्राण)किट प्राप्त करून घेण्यात आले.त्यासाठी आयुक्त अजीज शेख यांच्या निर्देशानुसार मुख्यलेखाअधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखा परिक्षक शरद देशमुख,लेखा अधिकारी विजय खेडकर यांनी परिश्रम घेतले. आता या कर्मचाऱ्यांचे मासिक वेतनातून कपात होणाऱ्या कर्मचारी अंशदान व मनपा अंशदानाच्या रक्कमा थेट शेअर बाजारामध्ये गुंतवल्या जाणार आहेत.यातून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या व्याजाचा परतावा हा भविष्य निर्वाह निधीपेक्षा जास्त असणार आहे.कर्मचाऱ्यांना याचा फायदा हा लॉंग टर्मसाठी होणार आहे.जे पैसे कपात होतात ते ऍपद्वारे कर्मचारी बघू शकणार असल्याचे आयुक्त अजिज शेख यांनी सांगितले.751 कर्मचाऱ्यांना पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(प्राण)किटचे वितरण करण्यात आले आहे.उर्वरित 149 कर्मचाऱ्यांचे काम प्रगती पथावर असल्याची माहिती मुख्यलेखाअधिकारी किरण भिलारे यांनी दिली. कर्मचाऱ्यांना पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर(प्राण किटचे)वितरण करतेवेळी आयुक्त अजीज शेख,सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे,उपायुक्त डॉ.सुभाष जाधव,मुख्यलेखाअधिकारी किरण भिलारे,मुख्यलेखा परिक्षक शरद देशमुख,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे उपस्थित होते.

मलंग गडावरील सुलतान बाबा दर्ग्याजवळ घरावर कोसळला महाकाय दगड

एकाचा दुर्दैवी मृत्यू कल्याण : मौजेवाडी येथील मलंगड गडावर  सुलतान बाबा दर्ग्या जवळ आज एक भीषण दुर्घटना घडली. यात एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  सकाळी 6 वाजताच्या  सुमारास सुलतान बाबा दर्ग्या जवळ वस्तव्यास असणाऱ्या गुलाम बादशाह  सय्यद यांच्या राहत्या घरावर महाकाय दगड कोसळला. यात गुलाम बादशाह सय्यद वय 35 व त्यांची पत्नी समीरा  गुलाम सय्यद वय 30 या गंभीर जखमी झाले. पुढे त्यांना सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथे त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. मात्र दहा वाजता सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर येथील डॉक्टरांनी गुलाम बादशाह सय्यद यांना मयत घोषित केले.यामुळे परिसरात शोककाळा पसरली आहे.

पश्चिम रेल्वे पावसाळ्यात सुपरफास्ट !

मान्सूनपूर्व बहुतांशी कामे पूर्ण, प्रशासनाचा दावा मुंबई : ऐन पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून किंवा तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा बंद पडू नये, यासाठी बहुतांशी मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाली आहेत, असा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे. विशेषत: रुळांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी गस्त घालण्यात येणार असून, हवामानाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी हवामान विभागासह मुंबई महापालिकेच्या यंत्रणांशी समन्वय राखला जाईल, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. ड्रोनद्वारे सर्वेक्षण कल्व्हर्ट आणि नाल्यांमधील चोक पॉइंट्सचे निरीक्षण, स्वच्छता आणि ओळखण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण केले जात आहे. बोरीवली, विरार विभागातील नाल्यांच्या सफाईसाठी ड्रोन सर्वेक्षण आणि देखरेखीचे काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण होईल. कल्व्हर्ट, नाल्यांची साफसफाई आणि गाळ काढणे, रुळांच्या बाजूने घाण काढणे, कचरा साफ करणे, अतिरिक्त जलमार्ग बांधणे, उच्च क्षमतेच्या पंपांची तरतूद करणे, झाडांची छाटणी करणे इत्यादी कामे मिशन मोडवर पूर्ण होत आहेत. नालेसफाई वेगात १) १.५० लाख घनमीटर राडारोडा हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम विशेष अशा डेब्रिज स्पेशल गाड्या, बीआरएन, जेसीबी, पोकलेनच्या मदतीने करण्यात आले. २) कल्व्हर्ट आणि नाल्यांच्या साफसफाईचे काम वेगाने पूर्ण होत आहे. यार्डातील पाण्याच्या प्रवाहाच्या पद्धतीचा अभ्यास करून पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी नवीन नाले बांधण्यात येत आहेत. ३) वांद्रे आणि बोरीवली येथील कल्व्हर्टची स्वच्छता करण्यासाठी डी-स्लडिंग मशीनचा वापर करण्यात आला. ४) प्रभादेवी-दादर सेक्शन, दादर-माटुंगा रोड सेक्शन, वांद्रे टर्मिनस यार्ड, गोरेगाव-मालाड सेक्शन, बोरीवलीत पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी १२०० किंवा १८०० मिमी व्यासाचे १५ पाइप बसवण्यात आले. ५) पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी ११ ठिकाणी नाले बांधले जात आहेत.

वसई व पालघरमध्ये महावितरणचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

वसई/पालघर : महावितरणच्या वसई आणि पालघर मंडल कार्यालयांतर्गत आयोजित स्वतंत्र कार्यक्रमांमध्ये महावितरणचा १९ वा वर्धापन दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दोन्ही कार्यक्रमांना कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर…

महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटनेचा

आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा ठाणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या कोकण विभाग कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार व संघटनेचे सल्लागार निरंजन डावखरे यांना पाठिंबा देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला, अशी माहिती संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष रमेश निवृत्ती जाधव यांनी दिली. शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य अध्यक्ष सुधीर देवराम घागस, कोषाध्यक्ष देविदास नरवाडे, विभाग सचिव ज्ञानेश्वर गोसावी, राज्य कार्यकारिणी सदस्य एस. जी पाटील, विभागाचे पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष आणि सचिव सभेवेळी उपस्थित होते. गेल्या १२ वर्षांपासून आमदार निरंजन डावखरे हे १२ वर्षांपासून पदवीधर आमदार असून शिक्षण क्रांती संघटनेचे सल्लागार आहेत. संघटनेच्या शासकीय दप्तरी कामांकरिता त्यांचे सातत्याने सहकार्य लाभत असून, त्यांना विभागातील समस्यांची संपूर्णपणे जाण आहे, असे नमूद करीत शिक्षण क्रांती संघटना पूर्ण ताकदीनिशी डावखरेंसोबत राहणार असल्याचे राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले. इंग्रजी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवणे. तसेच सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी महालढा उभारणे आदींकडे संघटना अधिक लक्ष देणार असल्याचे सभेत ठरविण्यात आले, असे श्री. घागस यांनी सांगितले. या वेळी उत्तम कांबळे, महेंद्र जाधव, डॉ. शहाजहान मौलना, राजेंद्र गवळी, सुरेश साळवे, संदेश पाटील, योगेश वल्लाळ, थॉमस शिनगारे, प्रशांत घागस, किशोर राठोड, अनिल मुरादे, प्रा. रमेश बुटेरे, सुरेंद्रनाथ दुसाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाणे पोलीस शाळेत ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !

युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे व्यवस्थापनावर कारवाईची मागणी अनिल ठाणेकर ठाणे : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाणे पोलीस शाळेत जवळपास ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याविरोधात ठाणे पोलीस शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करावी आणि विद्यार्थ्याना न्याय द्यावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे. शालेय नवीन वर्षाची सुरूवात विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा दिवस असतो. पण आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खारखर आळी येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. निराश पालकांनी याबाबत संपर्क करुन माहिती दिली असता त्यांना आणि त्यांच्या मुलांना झालेल्या वेदना ऐकून घेताना खूप वाईट वाटले  ॲडव्हान्स फी भरण्याची शेवटची तारीख १२ जून आहे तरी ठाणे पोलीस शाळेच्या व्यवस्थापनाने, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेतील प्रवेश नाकारण्यात आला. या विद्यार्थ्यांना सकाळी ७.३० वाजल्या पासून शाळेबाहेर उभे करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या घटनेचा काय प्रभाव पडेल ह्याचा जरा देखील विचार शाळा व्यवस्थापनाने केला नाही. यावेळी पोलीस शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका यांना देखील भेटलो. याप्रकरणी लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. यासंबंधी ठाणे पोलीस शाळा व्यवस्थापनावर कार्यवाहीसाठी पाठपुरावा करत राहणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा आनंदात शाळेत जाताना पाहण्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे ठाणे पोलीस शाळा व्यवस्थापनावर कारवाईची व विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली असल्याचे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले आहे. यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितिन लांडगे, ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, युवासेना ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजूडे, नितेश पाटोळे, युवासेना विधानसभा उपाध्यक्ष निखिल वाडेकर, सुशांत मयेकर,अशफाक शेख, ओम पवार, अखिल माळवी, साई ढवळे, अमित यादव, विराज कोकाटे, प्रसाद वाघ, संदीप तिवारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

येऊरचा सायकल राजा ठरला शिवम तर सायकल राणी ठरली निकीता

ज्येष्ठ नागरिक गटातून ॲड. मोहन निंबाळकर प्रथम ठाणे : कोण होणार येऊरचा सायकल राजा आणि राणी या स्पर्धेबद्दल सायकलप्रेमींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लूप अशी स्पर्धेची संकल्पना होती. अखेर रविवारी भर पावसात ही स्पर्धा संपन्न झाली. येऊरचा सायकल राजा (खुला गट) शिवम खरात, ज्येष्ठ नागरिक गटातून ६३ वर्षीय ॲड. मोहन निंबाळकर तर येऊरची सायकल क्वीन ठरली निकिता मधार. तसेच, खुल्या गटातून हवाई दलातील रजत मैन यांना रौप्य पदक तर नौदल सेवेतील रिंकू सिंग यांना कांस्य पदक तसेच, महिला गटातून ममता परदेशी यांना रौप्य तर कॅन्सरवर मात केलेल्या नेहा राजुरीकर यांना कांस्य पदकांनी गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सायकलपटू प्रा. नारायण बारसे, प्रा. सुनील भुसारा आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सायकलप्रेमींना मार्गदर्शन करताना प्रा. बारसे म्हणाले की, सायकलिंग येऊरला नियमीत केली तर फुप्फुसाची क्षमता खूप वाढते. मी मागच्या नोव्हेंबर महिन्यात ३०० लूप्स येऊरला केले होते. त्यामुळे मला येऊरचा फायदा माहित आहे. येऊरला साधारणपणे फारसे सायकलप्रेमी येत नाही. येऊरला सायकलिंग केले तर स्नायू बळकट होतात. या स्पर्धेमुळे नवीन सायकलप्रेमींनी येऊरला आले. सायकल सर्वांनी नियमीतपणे चालवायला हवी, फिट राहायला हवे.. सायकल ही नेहमी आपल्याला ऊर्जा देते. अशा भावना प्रा. बारसे यांनी व्यक्त केल्या. सुरूवातीला प्रास्ताविकात संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सांगितले की खरं तर येऊरसारख्या चढ उतार अशा शार्प वळणावर भर पावसात ही स्पर्धा आयोजित करुन ती यशस्वी करणे हे खूप मोठे आव्हान आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनसमोर होते. ते पेलण्यात संस्था यशस्वी ठरली हे विशेष. या स्पर्धेसाठी दिवसरात्र मेहनत करणारी माझी कोअर टीम चंद्रशेखर जगताप सर, अजय भोसले, भुसारा सर, निखील गावडे, पंकज रिझवानी, गुरूप्रसाद देसाई, अनिकेत गद्रे, विनोद फर्डे, गजानन दांगट यांनी विशेष मेहनत घेतली.

राज्य कॅरम –  माजी राष्ट्रीय विजेत्या संजय मांडेची उपांत्य फेरीत धडक

मुंबई : श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे सुरु असलेल्या कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उप…