Month: June 2024

येत्या गुरुवारी वंचितांच्या रंगमंचावर रंगणार युवा नाट्यजल्लोष

ठाणे : आर्थिक दृष्ट्या वंचित पण कलागुणांनी समृद्ध अशा युवांचा कलाविष्कार अर्थात युवा नाट्यजल्लोष या वर्षी येत्या गुरुवारी १३ जून रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर मधे संध्याकाळी ४ वाजता रंगणार आहे. ११ जून या साने गुरुजींच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने साने गुरुजी १२५ या अभियानांतर्गत हा कार्यक्रम सादर होत आहे. समता विचार प्रसारक संस्था आयोजित करत असलेल्या या उपक्रमात या वर्षी नाटकांची थीम असणार आहे ‘दीवार’ म्हणजेच ‘भिंत’! ठाणे परिसरातील खारटन रोड, अंबिका नगर, मानपाडा, किसन नगर आणि घणसोली अशा विभागातून युवा आपले विचार नाटकातून सादर करणार आहेत. श्रेष्ठ साहित्यिक आणि नाटककार स्मृतिशेष रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वंचितांच्या रंगमंचाचे हे दहावे वर्ष आहे, असे संयोजिका हर्षदा बोरकर यांनी सांगितले. प्रतिभाताई मतकरी, प्रतिभा मतकरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री व मराठी भाषा दूत, चिन्मयी सुमित, सिने दिग्दर्शक व टॅग सदस्य विजू माने, अभिनेता व टॅग सदस्य, उदय सबनीस, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया मतकरी विनोद, गणेश मतकरी, संपादक, दै. ठाणे वैभव चे संपादक मिलिंद बल्लाळ, लघु चित्रपटकार, आंतरराष्ट्रीय किर्तीचे फिल्म ज्युरी, डॉ. संतोष पाठारे, थिएटर कोलाजची संचालिका, अभिनेत्री, निवेदिका, पल्लवी वाघ – केळकर,टॅग अध्यक्ष, महेश शानबाग, श्रीरंग खटावकर, पत्रकार आणि यू ट्यूबर रविंद्र पोखरकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. ठाण्यातील संवेदनशील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी हा युवांचा कलाविष्कार बघण्यासाठी अवश्य यावे असे आवाहन समता विचार प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेचे सचिव अजय भोसले (81089 49102) यांच्याशी संपर्क करावा.

‘ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत माध्यमिक शाळेत प्रवेश घेऊ नका’

माध्यमिक शिक्षणाधिकारी ललीता दहितुले यांचे आव्हान ठाणे : ठाणे जिल्ह्यात एकूण २४ माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरू होत्या त्यापैकी २३ शाळा बंद केल्या असून सद्यस्थितीत ०१ अनधिकृत शाळा सुरू आहे. या ०१ अनधिकृत शाळेवर एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रकाशित करण्यामागे हाच उद्देश आहे कि पालकांनी पाल्याचे माध्यमिक शाळेत प्रवेश घेताना अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. पालकांनी अधिक माहिती घेऊनच पाल्याचे शाळेत प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी माध्यमिक ललीता दहितुले यांनी केले आहे. जिल्ह्यात अनधिकृत सुरू असलेल्या माध्यमिक शाळा बंद केल्याबाबतचे हमीपत्र सादर केलेल्या शाळाची यादी स्टारइंग्लिश हायस्कुल, दिवा, ठाणे मनपा क्षेत्र, डिवाईनग्रेस हायस्कुल, वज्रेश्वरी ता. भिवंडी  जि. ठाणे, आरएन इंग्लिश स्कूल कोन गाव भिवंडी ठाणे, फरानइंग्लिश मिडीअम स्कुल,गौरीपाडा, भिवंडी जि.ठाणे, आरंभइंग्लिश स्कुल श्री, गणेश नगर चौळ गणेश मंदिराचे मागे दिवा आगासन रोड दिवापुर्व, न्युगुरुकुल कॉन्व्हेंट स्कुल श्लोकनगर दातिवली रोड दिवा पुर्व 400602, ग्रीनव्व्हॅली कॉन्व्हेंट स्कुल,शिवसर्थ अपार्ट सदगुर नगर, दिवा आगासन दिवा जि.ठाणे, एस. एस. इंग्लिशस्कुल बाबुराव रेसिडेंन्सी हनुमान मंदिर निअर दिवा, आरएल पी हायस्कुल शिवम अपार्ट मुंब्रादेवी कॉलनी दिवा, आदर्शगुरुकुल स्कुल निअर जिव्हाळा हॉल दिवा इंग्रजी, आदर्शगुरुकुल स्कुल वैभव ढाब्यासमोर दिवा शिळ रोड दिवा पुर्व  माध्यम मराठी, आदर्शगुरुकुल स्कुल वैभव ढाब्यासमोर दिवा शिळ रोड दिवा पुर्व माध्यम इंग्रजी, एसआर पी इंग्लिश स्कुल वक्रतुंडनगर दिवा, ओमसाईइंग्लिश स्कुल, दातिवली रोड दिवा जि.ठाणे, श्री. विद्याज्योतीइंग्लिश स्कुल,नारायण कॉम्पलेस्क मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे, सिम्बॉयसिसस्कूल, सुंदरबन नगर, दातिवली रोड दिवा, केम्ब्रीजइंग्लिश स्कूल, मानसी कॉम्प्लेक्स भोलेनाथ मुंब्रादेवी कॉलनी रोड मुंब्रा जि.ठाणे, पब्लीकइंग्लिश स्कुल, गणेशपाडा दातिवली दिवा, आर्यगुरुकुल इंग्लिश स्कुल दातिवली रोड दिवा, श्रीरामकृष्णा इंग्लिाश स्कुल, दिवा दातिवली रोड दिवा, स्मार्टएज्युकेशन इंग्लिश स्कु मुंब्रा, जेडी इंग्लिश स्कुल फेस 2 श्लोक नगर मुंब्रा जि.ठाणे,…

लोकलमधून लंपास झालेले दागिने पुन्हा मिळाले

कल्याण: माटुंगा ते कसारापर्यंत प्रवास करणाऱ्या महिलेच्या बटव्यातील मोबाईल, सोनसाखळी असा एकूण दीड लाखाहून अधिक किमतीचा ऐवज गुरूवारी चोरीला गेला. रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी चोराला पकडून महिलेचा चोरीला गेलेला ऐवज परत केला. ठाण्यात संभाजीनगर भागात राहणाऱ्या श्वेता हेमंत शिंदे (२३) या नोकरदार आहेत. त्या माटुंगा भागात नोकरीला जातात. गुरूवारी कामावरून सुटल्यावर त्या माटुंगा रेल्वे स्थानकात कसाराकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बसल्या. त्यांना ठाणे येथे उतरायचे होते. पण बाहेर उन्हाची काहिलीने त्या हैराण होत्या. लोकलमध्ये खिडकीजवळ बसण्यास जागा त्यांना मिळाली. श्वेता यांना गाढ झोप लागली. ठाणे रेल्वे स्थानक येऊन गेले तरी त्यांंना काही कळले नाही. त्या थेट कसारा रेल्वे स्थानकापर्यंत पोहचल्या. तेथून लोकल कसारा यार्डात गेली. तेथे त्यांना जाग आली. त्यावेळी त्या सुरूवातीला घाबरल्या. कसारा येथे पोहचल्याचे लक्षात आल्यावर त्या सावध झाल्या. बटव्यातील मोबाईल, गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. श्वेता यांंनी तातडीने कसारा रेल्वे स्थानकात येऊन तेथून त्या कल्याण रेल्वे स्थानकात आल्या. त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात येऊन घडल्या चोरी प्रकाराची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी कल्याण रेल्वे स्थानकात आशीष जाॅन मकासरे याला अटक केली होती. त्याच्या जवळ एक महागडा मोबाईल, सोनसाखळी होती. हा ऐवज कोठूण आणला आहे याची सविस्तर माहिती आशीष पोलिसांना देत नव्हता. श्वेता लोहमार्ग पोलीस ठाण्यात हजर असताना रेल्वे पोलीस आशीषला पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यावेळी आशीष जवळ असलेला ऐवज आपला असल्याचे श्वेताने ओळखले. पोलिसांंनी आशीषवर गुन्हा दाखल करून श्वेता शिंदे यांचा मोबाईल, सोनसाखळी असा दीड लाखाहून अधिक किमतीचा ऐवज परत केला.

फी भरली नाही म्हणून शंभर मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशीच काढले वर्गाबाहेर!

ठाणे: पहिल्याच दिवशी चालू वर्षातील शाळेतील फी न भरल्यामुळे महागिरी येथील पोलीस शाळेत शिकणाऱ्या शंभर मुलांना त्यांच्या पालकांना कल्पना न देता वर्गाबाहेर काढण्यात आले, अशी शंभर मुले बाहेर काढण्यात आली. यात पोलिसांबरोबर इतर सर्वसामान्य नागरिकांची देखील मुलं आहेत. शाळेचे एक ॲप आहे आणि त्या ॲपवर 12 तारखेपर्यंत फी भरू शकता असे नमूद करण्यात आले आहे. परंतु असे नमूद केले असताना देखील आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि आजच फी आणायला हवी होती असा धोशा लावणाऱ्या पोलीस शाळा प्रशासनाने शंभर मुलांना वर्गाच्या बाहेर शाळेतील ग्राउंड वर बसवून ठेवले. पोलीस नाईक म्हणून काम करणाऱ्या लक्ष्मी क्षीरसागर म्हणाल्या की, “माझ्या मुलाला मी सात वाजता शाळेत पाठवले असते. आठ वाजता समजले की त्याला वर्गाबाहेर बसवून ठेवले. फी आम्ही वेळेतच भरतो. मी आता शाळेमध्ये चेक देखील घेऊन आली आहे परंतु शाळा प्रशासन, तेथील मुख्याध्यापक आम्हाला पालकांना दाद देत नाही. पोलिसांनी ड्युटी करायची का या प्रश्नाकडे बघत राहायचं. पोलिसांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही का?असा प्रश्न त्यांनी केला. पूनम कडव म्हणाल्या, एका मुलीने तिच्या घरी फी भरली नाही म्हणून आम्हाला बाहेर बसवला आहे असे तिच्या आईला कळवल्यानंतर तिच्या आईने मला कळवलं त्यावेळी मला समजलं माझ्या मुलाला बाहेर काढलेला आहे मी जनरल कॅटेगिरी मध्ये येते माझा पगार दहा तारखेला होतो त्यामुळे मी संध्याकाळी फी भरेल असे मी ठरवले असताना देखील आणि ॲपवर 12 तारखेची मुदत दिलेली असताना देखील त्यांनी माझ्या मुलाला बाहेर बसवलं मुलांच्या मनावरती काय परिणाम होणार अर्धी मुले शाळेत शिकत आहेत आणि अर्ध्या मुलांना वर्गाच्या बाहेर बसवण्यात आले आहेत. याचबरोबर, आम्ही मीडियाशी बोलो म्हणून उद्या आम्हाला भविष्यात त्रास होण्याची शक्यता आहे. उद्या आमच्या मुलांवर खुन्नस देखील काढली जाईल असेही या पालकांनी सांगितले आहे. वैभवी बांदेकर म्हणाल्या की, मी तर फी देखील भरली असताना देखील माझ्या मुलाला बाहेर बसवलं. आता मुलांना आमच्या ताब्यात देखील देत नाहीये. एका पालकांनी व्हिडिओ काढला म्हणून मुलांना एका रूममध्ये बसवण्यात आला आहे परंतु त्यांना वर्गात शिकण्यासाठी देत नाहीये. असा मनमानी कारभार पोलीस स्कूल प्रशासनाचा चालू आहे असा आरोप पालकांनी केला आहे.

फडके रस्त्यावरील झाड कोसळले, जीवित हानी नाही

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या फडके रस्त्यावरील बाजीप्रभू चौक भागात एक गुलमोहराचे झाड सोमवारी दुपारी बारा वाजता पाऊस, वारा, वीज नसताना अचानक कोसळले. त्यावेळी तेथून वाहन, पादचारी जात नव्हते. यामुळे जीवित, वित्त हानी झाली नाही. झाड पडल्याने रस्त्यावरील वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली होती. अखेर अग्निशमन दलाने झाड बाजूला करून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा केला. झाड कोसळल्याने फडके रस्ता वाहनांसाठी बंद झाला. डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे येणारी वाहने अचानक मदन ठाकरे चौक, एचडीएफसी बँक रस्त्यावरून नेहरू रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे चालकांना न्यावी लागली. अरूंद नेहरू रस्त्यावर एकावेळी रिक्षा, खासगी वाहने आल्याने या रस्त्यावर कोंडी झाली. डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने आणि वाहतूक पोलीस आणि वाहतूक सेवक यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी फडके रस्त्यावर कोंडी होणार नाही या दृष्टीने वाहतुकीचे नियोजन केले. काही वेळ सुयोग हाॅल येथून टिळक रस्ता, फडके रस्ता भागात येणारी वाहने सुयोग हॉल येथून इंदिरा चौक भागात वळविण्यात आली. झाड कोसळल्याची माहिती तातडीने वाहतूक सेवक दिनकर सोमासे यांंनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाची बहुतांशी वाहने कोसळलेली झाडे रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी गेली होती. यामुळे बराच उशीर फडके रोडवर अग्निशमन विभागाची वाहने पोहचली नव्हती. झाडांच्या फांद्यांचा पसारा रस्त्यावर पसरल्याने पादचाऱ्यांना या भागातून चालणे अवघड झाले होते. या झाडाच्या खाली आणि समोरील भागात फळ, भाजीपाला, इतर विक्रेते व्यवसाय करतात. परंतु, सुदैवाने ते अपघातामधून बचावले. इतर ठिकाणची कामे उरकून अग्निशमन विभागाचे पथक फडके रस्त्यावर आले. त्यांनी कोसळलेल्या झाडाच्या फांद्या बाजुला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. तोपर्यंत फडके रस्ता परिसरातील गल्लीतील रस्त्यांवर कोंडी झाली होती. या भागात आगरकर पथावर काँक्रीटचे काम सुरू असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.

इमारतीचे छत कोसळून वडील-मुलाचा मृत्यू

मुंबई: पहिल्याच पावसात विक्रोळी येथे रविवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे छत कोसळून त्यात वडील-मुलाचा मृत्यू झाला. याबाबत विक्रोळी पार्कसाईट पोलीस अधिक तपास करत आहेत. विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातील कैलास कॉम्प्लेक्स येथे रविवारी रात्री ही घटना घडली. गेल्या अनेक वर्षांपासून अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीजवळ नागेश रेड्डी (३८) हे सुरक्षारक्षकाचे काम करत होते. रविवारी रात्रीही ते नेहमीप्रमाणे कामावर असताना त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी त्यांचा दहा वर्षांचा मुलगा रोहित रेड्डी तेथे गेला होता. त्याचवेळी जोरात पाऊस आल्याने दोघेही तेथील छज्जाखाली उभे होते. त्याचवेळी अचानक छज्जाचा काही भाग दोघांच्या अंगावर कोसळला. काही नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, दोघाना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. शासनाने घटनेची तत्काळ दखल घेत संबंधित विकासकावर कारवाई करावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.

लोकसभेवर निवडून येऊनही नारायण राणे यांना डच्चू

मुंबई : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून येऊनही केंद्रीय मंत्रिमंडळातून नारायण राणे यांना वगळण्यात आले. अडीच वर्षांच्या मंत्रीपदाच्या कारकीर्दीत राणे फारसा प्रभाव पाडू न शकल्यानेच त्यांना डच्चू देण्यात आल्याचे…

महावितरणाच्या नवीन सबस्टेशन उभारणीसाठी मंजूर निधी वर्ग करण्याचे काम मार्गी लावणार-संजय केळकर

ठाणे : महावितरणाच्या नवीन सबस्टेशन उभारणीसाठी मंजूर निधी झालेला त्वरित संबंधित विभागाला वर्ग करावा यासाठी पाॅवर हाऊस कार्यालयातील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आ. संजय केळकर यांची भेट घेतली. आ. संजय केळकर यांनी याबाबत संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले. ठाण्यात नव्याने बांधण्यात येणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटल येथील जागेवर महावितरणाच्या नवीन सबस्टेशन उभारणी संदर्भात निधी मंजूर झालेला आहे तो त्वरित संबंधित विभागाला वर्ग करावा जेणे करून पुढील कामात सुलभता येईल व काम लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल या करिता पाॅवर हाऊस कार्यालयातील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आ. केळकर यांची भेट घेतली. यावेळी ठाण्यात सबस्टेशन मिळण्याकरिता अधिकाऱ्यांनी विनंती केली. आ. संजय केळकर यांनी याबाबत संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले. यावेळी माजी नगरसेवक सुनेश जोशी, महावितरणचे अधिकारी श्री. म्हसणे व श्री. सावरकर यावेळी उपस्थित होते.

विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक हे उद्दीष्ट  ठेवून संघटन मजबूत करा-आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : विधानसभा आणि महापालिकेची निवडणूक लढविणे हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त करुया, हाच संकल्प आपण घेऊया, अशी सदिच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस फक्षाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त सोमवारी ठाणे येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आनंद परांजपे म्हणाले की, लोकसभा निवडणूक निकालाच्या निमित्ताने कुठेही हताश न होता विधानसभा निवडणुकीसाठी संघटन अधिक बळकट करणे आणि जास्तीत जास्त ताकदीने येणारी विधानसभेची निवडणूक लढणे हे उद्दीष्ट कार्यकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. तसेच येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यानी पक्षाचे संघटन शेवटच्या बुथपर्यंत नेण्याचे काम केले पाहिजे. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आपण सर्व कार्यकर्त्यांनी करुया, हाच संकल्प आपण घेऊया हीच सदिच्छा सगळ्यांना देतो, अशी प्रतिक्रिया प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ. वनिताताई गोतपागर, युवक जिल्हा कार्याध्यक्ष श्री. संदेश पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री. प्रभाकर सावंत, श्री. रविंद्र पालव, परिवहन समिती सदस्य श्री. नितीन पाटील, विधानसभा अध्यक्ष श्री. विजय भामरे, श्री. अजित सावंत, श्री. निलेश कदम, ब्लॉक अध्यक्ष श्री. प्रविण खताळ, श्री. शंकर कोळेकर, श्री. समीर शेख, वॉर्ड अध्यक्ष श्री. साई प्रभू, श्री. रामचंद्र सकपाळ, श्री. सौरभ धुमाळ, महिला पदाधिकारी सौ. मायाताई केसरकर, युवक पदाधिकारी श्री. दिपक पाटील, विद्यार्थी सेल चे पदाधिकारी, अल्पसंख्यांक सेल चे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. हुसेन सर आणि इतर  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नॅप फाऊंडेशचे स्नेहसंमेलन ठाण्यात संपन्न

पालिवाल समाजातील मान्यवरांचा सन्मान एनीग्लो आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधन उत्पादनांचे लाँचिंग ठाणे : ठाणे शहरासह संपूर्ण भारतभर सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या नॅप फाऊंडेशच्या वतीने रविवारी उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील पालिवाल समाजातील ज्येष्ठ उद्योजक आणि तरुण उद्योजकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नॅप फाऊंडेशच्या संस्थापक अध्यक्षा निकीता पालिवाल यांच्या `दादीकी पोटली’ मधून निर्मिती झालेल्या एनीग्लो आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधन उत्पादनांचे मान्यवरांच्या हस्ते लाँचिंग करण्यात आले. महेश भवन, कासारवडवली, ठाणे येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला देशभरातून संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून आमदार संजय केळकर, डिम्पी बजाज (नागपुर युवती अध्यक्ष भाजपा), श्रीमती शर्मिला, श्री. यशपाल (राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य) श्री. मोहन, श्री.उमेश, श्री. आलोक, श्रीमती सीमा, श्री.दिनेश, श्रीमती अंजना, श्री.राहुल आदी मान्यवर उपस्थित हाते. ज्येष्ठ उद्योजक श्री. बाबूलाल (कोटा) यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. नव उद्योजक पुरस्काराने राशि पालीवाल (चंडीगढ), गोपाल (वर्धा), जया (फतहनगर), मयूर भट्ट (भावनगर, गुजरात), भावना (दिल्ली) यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महिला सक्षमीकरण्याच्या उद्देशाने महिलांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून नॅप फाऊंडेशच्या माध्यमातून दादीकी पोटली उपक्रमांतर्गत आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधने बनविण्यात आली आहेत. त्याचे लाँचिंग आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले.