अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांची गलिच्छ भाषा
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदू विरोधी वक्तव्य केल्यावरून प्रसाद लाड आक्रमक झाले होते. यावर दानवेंचा तोल ढळला. दानवेंनी लाड यांना मादर xx मेहणाले. यावर लाड यांनी दानवेंना बें xx म्हणाले. हिंदू धर्म रक्षणावरून सुरू झालेला वाद माणूसकीची ऐशीतैशी करणारा ठरला.
राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्याचा मुद्दा भाजपच्या प्रसाद लाड यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या वक्तव्या बाबत निषेधाचा ठराव उपसभापतींनी आपल्या अधिकाराचा वापर करून करावा असा मुद्दा लाड यांनी मांडला. त्यावेळी विधान परीषदेच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे लाजिरवाणा प्रकार घडला.
सुरूवातीला लोकसभेत केलेल्या वक्तव्याचा सभागृहाशी काय संबध असे विरोेधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले त्यावर शाब्दिक बाचाबाच होता दानवे यांनी प्रसाद लाड यांना खालच्या भाषेत शिविगाळ केली, त्यावर प्रसाद लाड यांनीही तितक्याच भाषेत शिवी देत दानवे यांना प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यामध्ये सभागृहात गलिच्छ भाषेत शिव्या देण्याचा पहिलाच प्रसंग विधान परिषदेत घडला. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आक्रमक होत राहुल गांधी यांनी समस्त हिंदू समाजाचा अपमान केला असून त्यांच्या विरोधात निषेधाचा ठराव दाखल करून घ्यावा, अशी मागणी सभागृह उपसभापती डॉ .नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले. हा संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान असून जर पंतप्रधान हिंदू समाजाचा अपमान आणि हा विषय गांभीर्याने घेत असतील तर निषेधाचा ठराव करण्याची मागणी भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी केली. यावेळी दरेकर यांच्यासह श्रीकांत भारतीय आणि इतर सत्ताधारी सदस्य़ांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी तुम्ही पण निषेध करा असे हातवारे करीत प्रसाद लाड बोलत होते त्यावेळी कॉग्रेस पेक्षा अंबादास दानवे फारच रागात दिसत होते.
या विधिमंडळाने राहुल गांधी यांच्या वक्तव्याची दखल घेतली पाहिजे. त्यांच्या निषेधाचा ठराव करून सुमोटो आणावा अशी मागणी दरेकर यांनी केली. तसेच जोवर सुमोटो दाखल होत नाही तोवर आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. असा पवित्रा घेतला होता. मात्र यावेळी प्रचंड गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित झाले.
लोकसभेत राहुल गांधी यांनी आमच्या महापुरूषांनी अहिंसा आणि भय दूर करण्याची भाषा केली आहे पण जे स्वताला हिंदू म्हणतात ते फक्त हिंसा, व्देष, आणि असत्यावर बोलतात त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा संपुर्ण हिंदूंचा अपमान आहे असे सांगितले. त्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू नाही, भाजपा म्हणजे हिंदू नाही, आरएसएस म्हणजे हिंदू नाही असे वक्तव्य केले होते.
माझा तोल सुटलेला नाही- अंबादास दानवे
“माझा तोल सुटलेला नाही. माझ्यावर बोट केलं तर मला बोट तोडण्याचा अधिकार आहे. मी विरोध पक्षनेता नंतर आहे, आधी शिवसैनिक आहे”, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. विधानपरिषदेत अंबादास दानवे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अंबादास दानवे यांच्याकडून आज विधानपरिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ देखील करण्यात आली. बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? अशी टीकाही अंबादास दानवेंनी केली.