अशोक गायकवाड

 

 

रायगड : ज्यांची खाती थकीत नॉन परफॉर्मिंग असेटस् (NPA) आहेत त्यांनी गुरुवार, ११ जुलैला थकीत नॉन परफॉर्मिंग असेट्स (NPA) कर्ज खाती तडजोड करून या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन बँक ऑफ इंडियाचे रायगड क्षेत्रीय प्रबंधक मुकेश कुमार यांनी केले आहे.

बँक ऑफ इंडिया गुरुवारी देशभरातील सर्व शाखा/ विभागीय कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालय मध्ये वन टाइम सेटलमेंट (OTS) अंतर्गत कर्जदारांच्या नॉन परफॉर्मिंग असेट्स (NPA) कर्ज खात्यांची पुर्तता करण्यासाठी समझौता दिवसाचे आयोजन करत आहे. समझौता दिवस विशेषत: अशा नॉन परफॉर्मिंग असेट्स (NPA )कर्जदारांसाठी तयार करण्यात आला आहे जे कर्जदाराच्या व्यवसायातील/वैद्यकीय स्थितीमुळे किंवा इतर कोणत्याही खऱ्या कारणामुळे कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत. आमच्या बँकेकडे लहान किमतीची खाती आणि मध्यम आकाराची खाती सेटल करण्यासाठी विशेष वन टाइम सेटलमेंट (OTS )योजना आहेत ज्याद्वारे ज्या कर्जदारांची खाती नॉन परफॉर्मिंग असेटस् (NPA) आहेत त्यांना विशेष आणि चांगल्या सवलती दिल्या जातात. बँक ऑफ इंडिया तर्फे सर्व कर्जदारांना आवाहन करतो की ज्यांची खाती थकीत नॉन परफॉर्मिंग असेटस् (NPA) आहेत त्यांनी गुरुवार,दि.११ जुलै २०२४ रोजी थकीत नॉन परफॉर्मिंग असेट्स (NPA) कर्ज खाती तडजोड करून या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे. असे आवाहन बँक ऑफ इंडिया चे रायगड क्षेत्रीय प्रबंधक मुकेश कुमार यांनी केले आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *