महाराष्ट्र राज्य सिनियर पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धा

 

 

 

मुंबई : नागरिक सहाय्य केंद्र संचालित ज्ञानेश्वर विद्यालय, वडाळा येथे महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सिनियर (इक्यूप्ड) पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धेत मुंबई उपनगराचा व्यंकटेश कोणार आणि ठाण्याची काजल भाकरे यांनी सर्वोत्तम लिप्टर किताबाचा मान मिळवला. या स्पर्धेतून आगामी २० ते २५ ऑगस्ट दरम्यान कोलकता, पश्चिम बंगाल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली.

स्पर्धेचा निकाल

महिला गट – ४७ किलो – काजल भाकरे (ठाणे), हर्षदा घुले, मानसी हांडे (दोघी मुंबई उपनगर), ५२ किलो – योगिता गायकवाड (मुंबई उपनगर), मीनाक्षी जाधव (पुणे), ५७ किलो – शुभांगी पाटील (कोल्हापूर), निवेदिता खारकर (मुंबई) अनंता बारुहा, (संभाजीनगर), ६३ किलो – सेजल मकवाना, (मुंबई उपनगर), आदिती सांगळे, रमय्या तारवडी, (ठाणे) ६९ किलो – अक्षया शेडगे, (नवी मुंबई), प्रेरणा साळवी (ठाणे), प्रिया कांदळकर (मुंबई उपनगर), ७६ किलो – रुबी दास (मुंबई), सेजल मोईकर, (पुणे), तृप्ती सावंत, (मुंबई) ८४ किलो – अश्लेषा गुडेकर, (मुंबई उपनगर), प्रतिभा लोणे, (ठाणे), शिवानी गुरव, (पुणे) ८४+ – मृणाली भोग, (पुणे), वैशाली तांडेल, (मुंबई), सुप्रिया मालवडकर, (पुणे)

पुरुष – ५३ किलो धर्मेंद्र यादव, (मुंबई), नीरज यादव (मुंबई उपनगर), प्रशांत दुुमडे, (ठाणे) ६६ किलो – वेंकटेश कोणार, (मुंबई उपनगर), साहिल उतेकर, (मुंबई), अमोल करगुटकर (मुंबई उपनगर) ७४ किलो – प्रांजल पाटेकर (ठाणे), वैभव थोरात (संभाजीनगर), दीपक शाहू (पालघर), ८३ किलो – अक्षय दीडवाघ, (सातारा), जितेंद्र यादव (मुंबई), मोहित गमरे, (संभाजी नगर), ९३ किलो – विवेक सांबरे (ठाणे), रवींद्र साळवे, कुणाल राठोड, (संभाजीनगर) १०५ किलो – ऋतुराज पाटील (कोल्हापूर), अश्विन सोलंकी (मुंबई), संकेत चव्हाण (मुंबई उपनगर), १२० किलो – जितेन राणे, (मुंबई उपनगर), अजिंक्य पडवणकर (मुंबई), राजेश शेटे, (मुंबई) १२०+ किलो – चैतन्य शास्त्री, (पुणे), रितीक पोळ, (रायगड)

चौकट

नर, दळवी, जोशी यांना जीवनगौरव

निवडचाचणी स्पर्धेच्या वेळी या खेळात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू विजया नर, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, विलास दळवी, जेष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांना असोसिएशनच्या विद्यमाने “जीवनगौरव” पुरस्काराने गौरविण्यात आले. सुहास जोशी हे सध्या दैनिक महाराष्ट्र स्पोर्ट्सचे मुंबई विभागाचे विशेष प्रतिनिधी व सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. हा पुरस्कार मिळवणारे ते या असोसिएशनचे पहिले क्रीडा पत्रकार ठरले. या अगोदर मधुकर पाटकर, (ठाणे), दिलिप केळुस्कर, विश्वनाथ सावंत, नरेश विनरकर (सर्व मुंबई) या दिग्गज खेळाडूंचा देखील असोसिएशनने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *