माथेरान : स्व.मीनाक्षी तमीळ आमुधन यांच्या स्मरणार्थ दि.७ रोजी नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळेत येथील गव्हाणकर एज्युकेशन ट्रस्ट, सेंट झेव्हियर स्कुल आणि वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेतील सर्व शालेय विद्यार्थ्यांना मिशन माथेरान सोशल ग्रुपच्या सौजन्याने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तर काही गरजवंत स्टोल्स धारकांना स्टोल छत्र्या देण्यात आल्या.

मुंबईचे रहिवासी आमुधन हे नेहमीच इथल्या गरजवंताला मदतीचा हात देत असून अत्यावश्यक साहित्य वाटप करीत असतात. त्यांच्या या महत्वपूर्ण कार्यात त्यांना मिशन माथेरान सोशल ग्रुपचे सहकार्य लाभत असते.याप्रसंगी भाजप अध्यक्ष प्रवीण सकपाळ,क्षत्रिय मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, राजेश चौधरी,संदीप कदम, किरण चौधरी, राकेश चौधरी,शैलेश चाफेकर यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. तर हरिहरपुत्र भजन समाज,लायन्स क्लब, रोटरी क्लब मुंबई,गिफ्ट अ स्माईल चेंबूर यांचे या कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान लाभले. यावेळी माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, प्रकाश सुतार,सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे,नितीन शहा, गव्हाणकर शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे, शिक्षक वृंद, तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *