राजीव चंदने

मुरबाड : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद,पुणे अंतर्गत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली,संलग्न यशोदिप  सामाजिक विकास संस्था संचलित कृषी महाविद्यालय सरळगांव कृषी वर्धिनी विभागातील विदयार्थ्यांनी बळेगाव येथे गाई,म्हैसी,बैल, लहान लहान वासरे आजारी पडू नये,तसेच त्यांना कोणत्याही साथीच्या रोगा पासून सुरक्षित राहण्या करिता लसीकरणाचे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी डॉ.महेंद्र सूर्यराव,एच डी जाधव सर,शेतकरी तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

ग्रामीण भागात पावसाळा सुरु झाला कि साथीचे रोग सुरु होतात आणि या रोगा मध्ये जनावरे आजारी होतात साथीच्या रोगा पासून सुरक्षित राहण्या करिता बळेगाव येथील योगेश विशे यांच्या फार्मावर जनावरा करिता लसीकरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ.महेंद्र सूर्यराव यांनी गाई,म्हैसी,बैल,वासरे यांना लसीकरण केले यावेळी उपस्थित शेतकरी विध्यार्थी यांना पाळीवप्राण्याच्या साथीच्या रोंगांची सखोल माहिती देत यावर कोणते उपाय केले पाहिजेत,कोणते आजार होतात या बाबत माहिती दिली बळेगाव येथे पहिल्यांदा जनावरा करिता लसीकरणाचे शिबीर घेण्यात आल्याने या शिबिरात करण्यात आलेल्या लसीकरणाने जनावरांचे आरोग्य निश्चितच सुरक्षित राहील म्हणत शेतकऱ्यांनी विद्यार्थी,शिक्षक,डॉ सूर्यराव यांचे आभार व्यक्त केले.

लसीकरण शिबिरा वेळी पावसाळ्या मध्ये विशेष करून FMD,HS,Botolizum या सारखे साथीचे रोग जनावरा मध्ये पाहण्यासाठी मिळतात असल्याने एफ एम डी,या रोगावर डॉ. सूर्यराव यांनी लसीकरण केले यावेळी कृषी विद्यालयाचे विध्यार्थी रिचा डोईफोडे,तन्वी खामगांवकर,सिद्धी कारभारी,सानिका कारभारी,अपूर्वा केंजळे,कोमल खुशह,विश्वजीत पोतदार,आर्यन ऊंडे,शुभम भगत,यश कराळे,रोहन कनसे,यश वाघ,स्वराज कापसे,ओमकार नारूडकर,सिद्धार्थ सुंदरे,साईराज वाबळे,साईनाथ नरके, सुरज पवार,या विदयार्थ्यांनी लसीकरण शिबीर यशस्वी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *