माजी नगरसेविकेचे राहिवाश्यांकडून आभार
मुंबई : प्रभाग क्रमांक 20 (अ ) येथे ठाणेकर वाडी कन्हैया नगर येथील मार्गावरती राजश्री शिव छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तसेच टीकम सोसायटी, संत मीरा सोसायटी, तुलशी भवन, मालुसरे चाळ येथील झाडांच्या फांद्या बऱ्याच वाढल्या होत्या सदर फांद्या जोराच्या वाऱ्यात किंवा जोराच्या पावसात पडून जीवित हाणी अथवा वित्त होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती म्हणून सदर रहिवासीयांनी शिवसेना विधानसभा संघटिका कोपरी पाचपाखाड. मालती रमाकांत पाटील (मा. नगरसेविका) व विभाग संघटक कोपरी ठाणे पूर्व रमाकांत (दादा) पाटील यांना कळविले असता त्यांनी तातडीने सदर संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून वाढलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या त्या प्रसंगी शिवसेना विधानसभा संघटिका मालती रमाकांत पाटील (मा. नगरसेविका) व विभाग संघटक कोपरी ठाणे पूर्व रमाकांत (दादा) पाटील शाखा प्रमुख गणेश मालूसरे यांचे रहिवाशियानी मनापासून आभार मानले व त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
