फ्रीजमधले खूप थंड पाणी पिऊ शकत नाही म्हणून आपण कधी कधी त्यामध्ये गरम पाणी मिसळतो. सामान्यपणे लोक असे करतात. पण आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे शरीरासाठी खूप घातक आहे.
गरम आणि थंड पाणी एकत्र पिणे शरीरासाठी घातक आहे. थंड पाणी पचनासाठी जड असते तर गरम पाणी हलके असते. दोन्ही एकत्र प्यायले जाते, तेव्हा पचनावर त्याचा परिणाम होतो. गरम पाणी वात आणि कफ शांत करतो, तर थंड पाणी दोन्ही गोष्टी वाढवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे हे पाणी पित्त दोष वाढवते. मातीच्या भांडीत ठेवलेले पाणी अमृतासमान असते. हे पाण्याला मूळ स्वभावापेक्षा थंड आणि शुद्ध ठेवते. एवढंच नव्हे तर या पाण्यात खनिजांचे प्रमाण जास्त असते. पाणी मध्यम तापमानामध्ये ठेवण्यासाठी याचा फायदा होत असल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे. मातीच्या भांड्यातील पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण मुबलक असते. म्हणूनच या पाण्यामुळे शरीर संतुलित राहते.
– डॉ. गोवर्धन हुसळे
