मुंबई : दादर येथील आंबेडकर भवनमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या १३वी मुंबई जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत खेलो तायकोंडो अकादमीच्या खेळाडूंनी २७ सुवर्ण पदके जिंकून शानदार कामगिरी केली. तसेच त्यांच्या खेळाडूंनी १२ रौप्य आणि ९ कांस्यपदके पटकावून ३५८ गुणांसह १४ वर्षानंतर प्रथम क्रमांक मिळविला. पदक विजेत्या खेळाडूंना राजेश मुराव, स्वप्निल साळुंखे, तुषार पाटील, कार्तिकेन नायडू या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. जसबीर कौर (गुरु नांनक खालसा कॉलेज ट्रस्टी), किरण माणगावकर ( कॅम्पस डायरेक्टर), माजी आमदार बाळा नांदगावकर यांचं देखील मोलाचे सहकार्य अकादमीला मिळालं आहे. महत्वाचं म्हणजे या सुवर्ण पदक विजेत्या खेळाडुंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.
