पुणे : सोमेश्वर फॉउंडेशन व क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने माजी आमदार कै. विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ २ ते ४ ऑगस्ट २०२४ दरम्यान सेंट्रल पार्क हॉटेल, संभाजी पार्क, पुणे येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये हि स्पर्धा रंगणार आहे. सोमेश्वर फॉउंडेशनच्या सनी निम्हण यांच्या पुढाकाराने प्रत्येक गटातील पहिल्या ८ विजेत्या खेळाडूंसाठी एकंदर १ लाख १० हजरांची रोख पारितोषिके जाहिर करण्यात आली आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध असून खेळाडूंनी संलग्न जिल्हा कॅरम संघटनेमार्फत आपली नावे २० जुलै २०२४ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ वर संपर्क साधावा.

०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *