राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या उपस्थितीत
अनिल ठाणेकर
ठाणे : राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या उपस्थितीत रविवारी, २८ जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – एकतावादी या पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा शास्री नगर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांनी दिली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आदींवर चर्चा होणार आहे. तसेच, राज्यात अनेक ठिकाणी बौद्ध, मातंग, चर्मकार समाजावर अन्याय – अत्याचाराचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्याविरोधात जनआंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. या मेळाव्यास राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे, राष्ट्रीय युवाध्यक्ष भय्यासाहेब इंदिसे , राष्ट्रीय सरचिटणीस प्रल्हाद सोनावणे आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत, असेही निकम यांनी सांगितले.
००००