२९ जुलै रोजी पदग्रहण सोहळा
अशोक गायकवाड

 

 

रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांना प्रतिष्ठेची असलेली मानद कर्नल पदवी संरक्षण मंत्रालय भारत सरकार कडून जाहीर झाली असून सदरचा (पीपिंग) पदग्रहण सोहळा, सोमवार दि.२९ जुलै रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या प्रेक्षागृहात आयोजित केला आहे.
ही पदवी विशिष्ट सेवा पदक मिळवलेले (vsm) अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगिंदर सिंग यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी कार्यकारी परिषदचे सदस्य,विद्या परिषदचे सदस्य तसेच विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण देशातून १९ विद्यापीठांच्या कुलगुरूंची निवड करण्यात आली असून त्यातून महाराष्ट्रातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्याचे प्रथम तंत्रशास्त्र विद्यापीठ असून या विद्यापीठास अभियांत्रिकी, फार्मसी ,वास्तुशास्त्र ,हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नॉलॉजी चे सुमारे ३४० महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. विद्यापीठ परिवाराकडून संलग्नित महाविद्यालयाकडून तसेच महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातून कुलगुरू प्राध्यापक डॉ. कारभारी काळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *