मुंबई : अंध मुलांच्या शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य विकास, स्वावलंबन साठी विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या NATIONAL ASSOCIATION FOR THE BLIND (NAB) ह्या राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या आपल्या देशातील अनेक पुरस्कार प्राप्त जागतिक कीर्ती च्या वंदनीय संस्थेच्या ( NAB IDBI POLYTECHNIC AMBERNATH)मध्ये सामाजिक कार्यकर्ते, खान्देश सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नितीन जावळे यांचा मुलगा सर्वेश चा वाढदिवस साजरा करण्यात आला त्या प्रसंगी अंध मुलांची शिक्षण, प्रशिक्षण,कला कौशल्य,स्वावलंबनाची जिद्द, सकारात्मक उर्जा, कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून उपस्थित सर्वांची मने भारावून गेले, त्या अंध विद्यार्थ्यां सोबत कुटुंबियांनी केलेले पारिवारिक स्नेह भोजन, त्यांच्याशी मारलेल्या मनमुराद गप्पा गोष्टी ह्या जणुकाही सर्वांनाच स्वर्ग सुखाचा आनंद देऊन गेल्या, तेथील मुले डोळयाने जरी अंध असले तरी त्यांचा मानवतेच्या दृष्टीने जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आपले सर्वांचे जीवन किती सुंदर,निसर्ग रम्य व मनमोहक असुन त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे…. हा त्यांचा ध्यास उपस्थितांच्या मनाला नवी उभारी आणि नवी दिशा देऊन गेला,सदर प्रसंगी National Association for the blind ह्या संस्थेचे श्री. सुहास चौधरी (टेक्निकल ॲडव्हायझर), संस्थेचे मानद सचिव श्री.हरींदर मलिक, सोशल वर्कर श्री.संतोष कालेकर,श्री.गोखले,श्री.शेखर तळकर,खान्देश सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नितीन जावळे, आदिवासी बहुल भागात कार्य करणाऱ्या समाजसेविका सौ. कामिनी जावळे, लोकमत सखी मंच च्या सन्मा. सौ.स्मिता चौधरी,गुणवंत विदयार्थी सर्वेश जावळे तसेच इतर सन्मा मान्यवर उपस्थित होते*.
(मरावे परी कीर्ती रुपे उरावे,,,,डोळे दान करणे हे पुण्याचे कार्य आहे….. आपला देह मृत्यु नंतर माती होतो, त्याची माती करायची का सोने करायचे हे आपल्या हातात आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *