ठाणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिका हद्दीत ब्लॉकस्तरीय आढवा बैठकांचा धडाका सुरु केला आहे.
रविवारी ठाणे महापालिका ब्लॉक क्रमांक 1 आणि 2 मधील पदाधिकारी, कार्यकर्ता यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, सहप्रभारी चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेश सचिव, सहप्रभारी संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. प्रदेश पदाधिकारी भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, माजी नगरसेविका शितल आहेर, रमेश इंदिसे, ज्येष्ठ नेते राम भोसले, बाबा शिंदे, धर्मवीर मेहरोल, युवक काँग्रेसचे आशिष गिरी, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष उमेश कांबळे यांच्यासह ब्लॉक क्र. 1 चे अध्यक्ष श्रीकांत गाडीलकर, ब्लॉक क्र. 2 चे अध्यक्ष आनंद सांगळे यांच्यासह सेल/विभाग अध्यक्ष व ब्लॉक मधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंद्रकांत पाटील, संतोष केणी आणि विक्रांत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *