ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांत 100% अनुदानावर (मोफत) कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान राबविण्यात येत आहे.
लाभाचे स्वरुप :- या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटुंबाला पुढील प्रमाणे जमीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. १) ४ एकर कोरडवाहू (जिरायत) जमीन किंमत कमाल रुपये ५.०० लक्ष प्रती एकर किंवा (२) २ एकर ओलीताखालील (बागायत) जमीन किंमत कमाल रुपये ८.०० लक्ष प्रती एकर. लाभार्थी निवडीचे निकष :- १) लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. २) लाभार्थी दारिद्रय रेषेखालील भूमिहीन असावा. ३) लाभार्थ्यांचे वय किमान १८ वर्ष व कमाल वय 60 वर्ष असावे.
निवडीचा प्राधान्यक्रम :- १) दारिद्रय रेषेखालील भूमीहीन परितक्त्या स्त्रिया. २) दारिद्रय रेषेखालील भूमिहिन विधवा स्त्रिया. ३) अनुसूचित जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचार ग्रस्त.
इच्छुक पात्र लाभार्थ्यांने अधिक माहिती करिता, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे ४ था मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, स्वामी समर्थ मठाजवळ, कळवा, ठाणे पश्चिम-४००६०५ येथे संपर्क साधावा, असे ठाणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *