लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाढदिवसानिमित्त
मुंबई : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा १ ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात साजरा करणार असून अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव या जन्मगावी प्रेरणादायी अशा भव्यदिव्य कार्यक्रमाने साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगांव या जन्मस्थानी १ ऑगस्टला त्यांच्या घरापासून ते स्मारकापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे समग्र साहित्य पालखीतून पारंपारिक मिरवणूकीतून गौरविण्यात येणार आहे. अण्णाभाऊ यांच्या स्मारकाच्या समोरील प्रांगणात अण्णाभाऊंनी रचलेल्या नामांकित पोवाड्यांच्या जलसाने या ग्रंथदिडीचे स्वागत करून अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात येणार अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी दिली.
याशिवाय २ ऑगस्टला सातारा येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ‘राज्यस्तरीय ब्रास बॅण्ड महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून यामध्ये राज्यभरातील नामांकित बॅण्ड पथक सहभागी होणार आहेत. या कलावंताना राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सन्मानचिन्ह व सन्मान पत्रकाने गौरवण्यात येणार आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा यंदाचा जयंती उत्सव राज्यभरात गाव, तालुका आणि जिल्हास्तरावर साजरा करण्याचा कार्यक्रम देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना देण्यात आला असून यामध्ये पक्षसंघटनेच्यावतीने उपक्रम घेवून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव साजरा करण्याचे आवाहन सुनिल तटकरे यांनी केले आहे.
00000