मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) कार्यालयाचे उद्घाटन १ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे सकाळी ११ वाजता हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज व लाभार्थ्यांना विविध योजनेअंतर्गत कर्जाचे धनादेश वितरण करण्यात येणार आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *