सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला

नवी दिल्ली : बोगस प्रमाणपत्राव्दारे आयएएस बनलेल्या पुजा खेडकरच्या अडणीत वाढ झाली आहे. सुप्रीम कोर्टाने तीचा अटकपुर्व जामीन फेटाळल्यामुळे तीला आता कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते. त्यातच यूपीएससीने तीचे आयएएस हे पद काढून घेतले आहे.

यूपीएससीने दिल्ली पोलिसांकडे पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकर प्रकरणात आता तीला मदत करणारे अनेकजण अडचणीत येणार आहे.

यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत पूजा खेडकरवर दिल्लीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये आपल्याला अटक होऊ नये यासाठी पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने नाकारला आहे.

पूजा खेडकरची आता दिल्ली पोलिस चौकशी करणार असून त्यामधून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरांना अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी कुणी मदत केली, तिच्या निवडीच्या वेळी कुणी हस्तक्षेप केला या सर्व गोष्टी आता समोर येण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयाने खेडकरांना दिलेलं सात टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र खरे असल्याचा दावा डॉक्टर राजेश वाबळेंनी केलाय. मात्र खेडकरांनी MRI रिपोर्ट फक्त दाखवला पण तो कागदपत्रांसह जोडला नाही याची कबुली डॉ वाबळेंनी दिलीये. तपासण्या झाल्यानंतर सर्व कागदपत्रे दिव्यांग विभागात रुग्णाने जमा करण्याची परंपरा पूर्वीपासून आहे असं म्हणत वायसीएम रुग्णालयाने हात झटकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *