अशोक गायकवाड
नवी मुंबई : थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे महापालिका आयुक्त् डॉ.कैलास शिंदे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपआयुक्त् शरद पवार, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त् डॉ.अजय गडदे, अतिरिक्त् शहर अभियंता अरविंद शिंदे, भांडार विभागाचे उपआयुक्त राजेंद्र चौगुले, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री उत्तम खरात, विलास मलुष्टे, संजीव पवार, रवि जाधव आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000