उल्हासनगर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 200  विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मरसाळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
उल्हासनगर प्रभाग क्रमांक 7, गरीबनगर  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय या  ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना नेते, राजेंद्र चौधरी, युवासेना नेते बाळा श्रीखंडे  भाजप नेते संजय सिंग, टी ओ के प्रवक्ता.कमलेश निकम, माजी नगरसेवक डॉ सुरेंद्र सिंग .मातंग समाज नेते सुभाष मरसाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी स्थानिक कार्यकर्ते नामदेव मरसाळे.सखाराम कनगरे  अशोक उमाप. दिलीप अवसरे ,शालिक साळवे, सागर पगारे ,रवीद्र सौदागर ,अतुल शिंदे,प्रकाश ससाणे ,आजय नन्नवरे ,हरी पवार.,राहुल सौदागर आकाश कांबळे, शंकर कांबळे, सोनू गुप्ता. शंकर मरसाळे आदी उपस्थित होते.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *