ठाणे : कुठल्याही खेळात निरीक्षण हेच प्रशिक्षण असल्याचे फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे जेष्ठ लेग स्पिनर विवेक मोरेकर यांनी केले. १९६० साली स्थापन झालेल्या फ्रेंडशिप क्रिकेट क्लबच्या १४ व्या फ्रेंडशिप डे निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात उपस्थितांचा प्रतिनिधी म्हणून मोरेकर बोलत होते.
फ्रेंडशिप क्रिकेट क्लबचे सर्वात जेष्ठ सदस्य दिवंगत मदन नाखवा आणि सौ निलम मदन नाखवा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नाखवा कुटुंबीय आणि त्यांचे जावईअभिजित दुराफे यांनी हा मैत्रीदिनाचा कार्यक्रम पुरस्कृत केला होता. यावेळी मनोगत व्यक्त करताना विवेक मोरेकर म्हणाले, १९६० साली क्लबची स्थापना झाली तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता.पण क्लबचे वरिष्ठ खेळाडू माझे आदर्श होते.जेष्ठ बंधू हरेश्वरचा अभेद्य बचाव, अमीरअली अहमदाबादीची जादुई फिरकी, प्रल्हाद नाखवांची दहशती भन्नाट फलंदाजी, आनंद ठाणकरची षटकारांची टोलेबाजी, हातातून निसटू शकतील असे सामने जिंकून देणारा कै.नलीन मोरेकर, क्षेत्ररक्षणातील आदर्श प्रदीप ठाणकर या जेष्ठांचा खेळ बघून माझ्यातला क्रिकेटपटू घडत गेला.
शेल्टर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात चारुदत्त ठाणकर, हरेश्वर मोरेकर, रमेश नाखवा आणि रमाकांत कोळी यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.क्लबचे कार्यवाह प्रल्हाद नाखवा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर सहकार्यवाह बळवंत सकपाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *