राजेंद्र साळसकर

 

 

मुंबई : भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्र.२०५ चे वॉर्ड अध्यक्ष गणेश बाळकृष्ण शिंंदे याच्यावतीने विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप तसेच दिव्यांग व्यक्तींसाठीमोफत व्हीलचेअर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी येवला पैठणीचे मालक प्रविण काकड यांच्यावतीने देण्यात येणा-या पैठणीचा ,उखाणा व मंगळागौर हा खेळ एकदम मजेशीरपणे रंगला. या कार्यक्रमाची खरी रंगत वाढविली ती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे सचिन श्रीधर यांनी.सचिन श्रीधर यांनी आपल्या खुमासदार शैलीने उपस्थितांची मने जिंकली.यावेळी विभागातील राष्ट्रपती पदाने सन्मानीत व्यक्ती,विभागीय डॉक्टर,समाजसेवक व ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कौशल्य व विकास मंत्री मंगलप्रभात लोढा,मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षा श्रीमती शलाकाताई साळवी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष शरद चिंतनकर, दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री राजेश मिश्रा,दक्षिण मुंबई जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सनी सानप, मुंबई शिक्षक सेलचे अध्यक्ष राजू बंडगर,दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सतिश तिवारी,शिवडी विधान सभा अध्यक्ष दिलीप धुरी,शिवडीं विधान सभा महिला मोर्चा अध्यक्षा सौ.जान्हवी दमनकर, शिवडी विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष विशाल कांबळे,शिवडी विधान सभा युवती मोर्चा अध्यक्षा सौ.सोनिया जेनेपल्ली तसेच शिवडी विधान सभाचे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *