ठाणे : श्रावण महिना म्हणजे सणांविषयी उत्सुकता आणि सणांच्या निमित्ताने होणाऱ्या नवनवीन चविष्ट पदार्थांची रेलचेल म्हणूनच श्रावण महीन्याच हे महत्व जपण्यासाठी श्रावण आणि आपली खाद्यसंस्कृती साजरी करण्यासाठी दरवर्षी श्रावण महोत्सव पाककला स्पर्धा आयोजित केली जाते.
दरवर्षी प्रमाणे यंदाही मिती क्रिएशन व चैत्र गौरी महिला मंडळ यांच्या सहकार्यांने उत्तरा मोने प्रस्तुत “श्रावण महोत्सव २०२४ पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यंदाचे हे १० वे वर्ष असून बुधवार ०७ ऑगस्ट रोजी माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील पाचपाखाडी येथील ज्ञानराज सभागृह येथे प्राथमिक फेरी संपन्न झाली
त्यावेळी खासदार राजन विचारे, मा. नगरसेविका नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, महिला उप जिल्हा संघटक आकांक्षा राणे, विभाग संघटक राजेश्री सुर्वे, उपजिल्हा संघटक ज्योती कोळी कार्यक्रमाच्या सादरकर्त्या उत्तर मोने तसेच परीक्षक फॅमिली स्टोअर च्या कला जोशी, भाग्यश्री लेले, डॉ. रेश्मा बाबरे, स्मिता देसाई, विभा सप्रे, पल्लवी समेळ, श्री. पराग बापट, संगीता ढोले व इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता
तसेच या प्राथमिक फेरीमध्ये ठाण्यातून मोहिनी घरत, संगीता मांडलूसकर, ज्योत्स्ना अभ्यंकर, गौरी चिपळूणकर, सुषमा पोतदार या स्पर्धेत विजयी झालेल्या ५ स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. पुढील फेऱ्या दादर, बोरीवली, गोरेगाव, विक्रोळी, डोंबिवली, पुणे, नाशिक, गिरगाव, वसई याठिकाणी सर्व प्राथमिक फेऱ्या होणार असून या प्रत्येक फेरीतून ५ स्पर्धक निवडले जातील आणि अंतिम फेरी ५० जणांमध्ये होणार आहे. या श्रावण महोत्सवाला ठाण्यातून महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याने मिती क्रिएशन्स च्या वतीने नंदिनी विचारे यांचे आभार मानले.
००००
