राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना कृतिम खताचे पुरवठा होत नसल्याने तात्काळ खतांची उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते.
तालुक्यातील लोक संख्या ही शेतीच्या उत्पादनावर अवलंबून आहे, पावसाळ्यात शेतीत होणाऱ्या भात नागली, वरई इत्यादी पिकांवर शेतकरी आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. तालुक्यात लागवड योग्य मुबलक असून लागवडी नंतर लागणाऱ्या खतांची उपलब्धता दुकानदारा कडून कमी होत असल्याचे समजले असता खतांचा पुरवठा करणारे दुकानदार यांनी मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे. अश्या दुकानदारांवर कायदेशीर कारवाई व्हावी, या मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी भजन कीर्तन करून असे अनोखे आंदोलन केले.या आंदोलन मध्ये शिवसेना संपर्क प्रमुख संतोष जाधव, उपतालुकाप्रमुख राजेश भांगे, रमेश घोलप, नरेश देसले,विनायक ढमणे,विलास शिंदे,अशोक मांडे,भाऊ यशवंतराव, रामचंद्र सासे,भरत गायकर,पांडुरंग धुमाळ, धनाजी चौधरी,मिलिंद घरत,बबलु ब्हाडकर,विठ्ठल देशमुख, दिनेश खापरे,सुधाकर घुडे,तानाजी खापरे,अमोल मलिक,अमोल गगे, चिंतामण गायकर, गोपाळ धाणके, व आदिवासी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
